अभिनेता गश्मीर महाजनीचे वडील आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात निधन झालं. १५ जुलैला पुण्यातील एका फ्लॅटमध्ये रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले होते. या घटनेमुळे गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करून त्यानं उत्तरही दिलं होतं. पण आता पुन्हा एकदा गश्मीर ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गश्मीरनं काल इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यानं चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. एका चाहत्यानं त्याला विचारलं की,’ तुझी आई आता ठीक असेल, अशी अपेक्षा करतो.’ यावर गश्मीर म्हणाला की, ‘हो तिला आजच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ती आता ठीक आहे.’ त्यानंतर एका चाहत्यानं गश्मीरला त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला की, “हो खूप प्रोजेक्ट आहेत. पण मागील आठवड्यात आईची तब्येत ठीक नसल्यामुळे तिची काळजी करण्यात व्यस्त होतो. आता ती ठीक आहे. येत्या १५ दिवसांत मी कामावर परतेन.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा व्हिसा झाला होता रिजेक्ट; पृथ्वीकनं सांगितलं कारण, म्हणाला…

त्यानंतर गश्मीरला ट्रोर्लिंगविषयी विचारण्यात आला. एका चाहत्यानं विचारलं की, ‘तुझ्या आयुष्यात नुकत्यात घडलेल्या घटनेदरम्यान तुला ट्रोल करण्यात आलं. त्या ट्रोलर्संना तू काय उत्तर देशील?’ या प्रश्नावर गश्मीर म्हणाला की, “मी कधीतरी उत्तर दिलं असेल, पण मी नंतर विचार केला की का? ते माझं आयुष्य जगत नाहीयेत आणि त्यांना जगायचं असेल तरी ते कधीच जगू शकत नाहीत. तर सगळ्यांनीच शांततेत जगूयात. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. पण माझ्याकडे भरपूर लोकं आहेत; ज्यांची मला काळजी घ्यायची आहे आणि भरपूर काम आहे जे मला करायचं आहे.”

हेही वाचा – लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळेंचं ‘हे’ आहे कायदेशीर नाव; स्वतः खुलासा करत म्हणाले…

दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर गश्मीरनं काही त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. एका नेटकऱ्यानं प्रतिक्रियेत लिहिलं होतं की, ‘वडिलांबद्दल एखादी पोस्ट करशील अशी अपेक्षा होती. पण तू साफ निराशा केली. नितीन देसाईंबद्दल पोस्ट केली, पण जन्मदात्या बापाबद्दल एवढा आकस की त्यांच्याबद्दल तू दोन शब्द ही लिहू शकला नाहीस. जो मुलगा बापाचा होऊ शकला नाही तो जनतेचा काय होणार? तुझ्याकडून आदर्श घेण्यासारखं काय आहे हे तूच सांग? वडिलांच निधन होऊन दोन-तीन दिवस झाले तरी तुला फरक पडला नाही किंवा समजलं नाही. इतका क्रूर व्यक्ती मी तरी माझ्या आयुष्यात बघितला नाही. आतापर्यंत तुझ्यासाठी खूप लिहिलं. पण रवींद्र सर गेल्यानंतर तू सोशल मीडियावर पोस्ट टाकतो की नाही याची वाट पाहत होतो आणि तू त्यात सपशेल अपयशी ठरलास.’

हेही वाचा – …यामुळे खारुताईनं पूजा सावंतचा घेतला चार वर्ष बदला; कधी चावली, तर कधी अभिनेत्रीच्या कपड्यांच्या केल्या चिंद्या

या नेटकऱ्याला गश्मीर चांगलंच उत्तर दिलं. तो म्हणाला की, “तुम्ही कोण? तर सोशल मीडियावर इतरांच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करून महत्त्व मिळवणारे दल्ले. आमचा खासगी प्रश्न आम्ही आणि आमची आई जाणतो. हे फक्त ह्या खेकड्या करता नाही. तर सोशल मीडियावरील सर्व खेकड्यांकरिता आहे. आता पाय ओढत बसा. ८ वर्षांचा होतो तेव्हापासून आईनं एकहाती वाढवले. तेव्हा आम्ही रस्त्यावर होतो आणि तुझ्यासारखे खेकडे रोज पाय ओढायला यायचे. पण खेकड्यांच्या श्रापाने आम्ही मरत नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor gashmeer mahajani again answer to trollers pps
Show comments