Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक उमदा कलाकार गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Dombivli Nigerian citizen committed suicide by jumping from 15th floor
डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
iit delhi student suicide news marathi
IIT विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, आत्महत्येचा संशय; हत्येची शक्यता पोलिसांनी फेटाळली!
Businessman commits suicide due to financial fraud Pune print news
आर्थिक फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या; सातजणांविरुद्ध गुन्हा
dead body cantonment
पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला
political twist in the suicide of a professional DJ
भंडारा : डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येला राजकीय वळण
Shocking VIDEO: Noida Man Attempts Suicide After Losing Job
“भावा नोकरी दुसरी मिळेल पण आयुष्य…” तरुणाचा १२ व्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न; एक पाऊल पुढे टाकलं अन्..थरारक VIDEO पाहाच

आणखी वाचा : मुंबईत हुबेहूब हिमाचल प्रदेश उभं करणारे नितीन देसाई काळाच्या पडद्याआड; ‘या’ चित्रपटाने मिळवून दिलेली ओळख

अभिजीत पानसे, अमोल कोल्हे, महेश मांजरेकर, आदेश बांदेकर यांच्यासह कित्येक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. नुकतंच अभिनेता गश्मीर महाजनी याने सोशल मीडियावर पोस्ट करत नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. नितीन देसाई यांचा फोटो शेअर करत गश्मीरने लिहिलं, “भावपूर्ण श्रद्धांजली..सरांच्या कुटुंबियांना या कठीण व दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्यास शक्ति मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”

काही दिवसांपूर्वी गश्मीर महाजनीचे वडील रवींद्र महाजनी यांचेही तळेगावमधील घरात निधन झाल्याचे समोर आले होते. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच उलट सुलट गोष्टी समोर आल्या आणि त्याचा गश्मीर व त्याच्या कुटुंबीयांना त्रास झाला होता. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे अस्वस्थ झालेल्या गश्मीर महाजनीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

gashmir-mahajani-post
फोटो : सोशल मीडिया

नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. एखाद्या चित्रपटाचं ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात नितीन देसाई यांचा सिंहाचा वाटा होता.