रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर बुधवारी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माहितीनुसार, ४८ कुटुंबाची ही वाडी असून त्यातील २५ ते ३० घरांवर दरड कोसळली. आज, दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. ‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून मातीचा ढिगारा बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेवर कलाकार मंडळी हळहळ व्यक्त करत मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. या इर्शाळवाडीचा एक ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांनी शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत दुर्घटनेपूर्वीचं इर्शाळवाडी गाव दिसतं आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी, घनदाट झाडीत वसलेलं हे सुंदर इर्शाळवाडी गाव पाहायला मिळत आहे. हा ड्रोन व्हिडीओ शेअर करत गिरीश ओक यांनी लिहिले की, “किती सुंदर गाव होतं. पण, आज महाराष्ट्र हळहळतो आहे, हे अगदी खरं आहे. पण एक विचार असा येतो, आता तरी ज्या गावांना अशा प्रकारचा धोका आहे, त्यांना तिथून स्थलांतरित करावं. आताच्या त्रासापेक्षा नंतरची हळहळ जीवघेणी आहे.”

हेही वाचा – “इज्जत की बची ना चिंधियाँ, वहाँ बिके पवार और सिंधिया…”; मणिपूरच्या घटनेवर स्वानंद किरकिरेंचा सणसणीत टोला

हेही वाचा – शितलीची तिसरीही मालिका ठरली फ्लॉप; आता ‘लवंगी मिरची’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

व्हिडीओच्या शेवटी इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलं आहे. गिरीश ओक यांच्या प्रतिक्रियेवर काही नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. एका नेटकरीने लिहिले की, “अगदी बरोबर आहे,” तर दुसऱ्या नेटकरीने लिहिले आहे की, “बैल गेला आणि झोपा केला,” अशी गत आहे महाराष्ट्राची आज. सरकारच अस्थिर असतं कायम, लोकांकडे कुठून बघणार?

हेही वाचा – “नको गं नको” मृण्मयी देशपांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवर बिग बॉस फेम ‘अभिनेत्याची’ प्रतिक्रिया

दरम्यान, गिरीश ओक यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकात काम करताना दिसत आहेत. रंगभूमीवर हे नाटक जोरदार सुरू आहे. गिरीश ओक यांच्याबरोबर अभिनेत्री श्वेता पेंडसे मुख्य भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor girish oak react on raigad irshalwadi landslide pps
Show comments