अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता या चारही भूमिका उत्तमरित्या पेलणारा कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. हेमंत नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट घेऊन येत असतो. ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यांसारखे दर्जेदार चित्रपट हेमंतने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. नवीन वर्षात हेमंत नवा चित्रपट घेऊन येत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ असं चित्रपटाचं नाव आहे. अशातच हेमंत ढोमेच्या कुटुंबात नवीन सदस्य आली आहे; जिच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. शिवाय आजूबाजूला चालणाऱ्या घडामोडींवरही हेमंत परखड मतं मांडत असतो. नुकतंच त्याने कुटुंबात आलेल्या नवीन सदस्याचा फोटो शेअर केला आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

हेमंत ढोमेच्या कुटुंबात आलेली ही नवीन सदस्य गाय आहे. या गायीचा फोटो शेअर करत हेमंत म्हणाला, “आपल्या फॅमिलीची नवी मेंबर. लक्ष्मी ढोमे.” त्यानंतर हेमंतने गायीचा अजून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे, “देखणी लक्ष्मी.” हेमंतने शेअर केलेल्या या सुंदर गायीचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – ७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”

हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी
हेमंत ढोमे इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – ५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…

दरम्यान, हेमंत ढोमेच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा ‘फसक्लास दाभाडे’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट २४ जानेवर २०२५ला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा जबरदस्त पोस्टर प्रदर्शित झाला होता.

Story img Loader