हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी आणि पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतर आजपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘झिम्मा २’ या चित्रपटातील सर्व कलाकार हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत क्षिती आणि हेमंत एका डोंगराळ वाटेतून चालताना दिसत आहेत. याला हेमंतने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’
हेमंत ढोमेची पोस्ट
“हे असंच एकमेकांना साथ देत, खाच खळग्यातुन वाट काढत… कधी अडखळत तर कधी हसत खेळत… झिम्मा २ चा संपुर्ण प्रवास झाला! पण या प्रवासाची प्रचंड मजा घेत आम्ही आपला झिम्मा २ पुर्ण केला… माझ्या संपुर्ण टिम ची साथ नसती तर हे शक्य झालं नसतं, झिम्मा २ शी जोडल्या गेलेल्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो!
हा सिनेमा आमचा राहिला नाही, तो तुमचा झालाय… ती सगळी पात्र, त्यांचं सारंकाही तुमचं झालंय… मागच्या खेपेला तुम्ही त्याचा सोहळा केलात… आम्हाला खात्री आहे, यावेळी देखील तुम्ही तितकंच प्रेम कराल!
आमचं म्हणजे चलचित्र मंडळीचं हे तिसरं अपत्य… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने बहाल करतोय, आजपासून जवळच्या चित्रपटगृहात!”, असे हेमंत ढोमेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी फक्त…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या रिअल लाईफ सूनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रियाही समोर येताना दिसत आहेत.