मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा सर्वच क्षेत्रात काम केलेला अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याने मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही अढळ स्थान निर्माण केले आहे. जितेंद्र जोशीचा फार मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने एका किस्सा सांगितला आहे.

जितेंद्र जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका व्यक्तीला चांगलेच खडे बोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Marathi writer actress Madhugandha Kulkarni post viral
“ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

जितेंद्र जोशीची पोस्ट

नो एण्ट्री मधून येणाऱ्या तरुणाला मी हटकले. त्यावर तो चल जा म्हणाला.
मी – का येतो आहेस नो एण्ट्री मधून?
तो – कामावर जायला उशीर झालाय?
मी – सुशिक्षित आहेस ना?
तो – शिवी का देतो?
मी – शिवी नाही मी सुशिक्षित म्हणालो?
तो – म्हणजे काय?
मी – म्हणजे तू वागतो आहेस ते?
तो – पण तुला काय फरक पडतो?
मी – कारण मी नागरिक आहे?
तो – म्हणजे? नागरिक म्हणजे?
मी – तू आणि मी
तो – संसदेत जाऊन सांग?
मी हसू लागतो त्या कंपनीवर ज्याने याला कामावर ठेवलाय, माझ्या स्वत:वर आणि गाडी काढतो… तो नो एण्ट्रीमधून तसाच पुढे जात राहतो, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

jitendra joshi
जितेंद्र जोशीची पोस्ट

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

दरम्यान जितेंद्र जोशीने केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्याने ही पोस्ट कशाबद्दल आणि कोणाबद्दल केली आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तो काही दिवसांपूर्वी ‘गोदावरी’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळवलं होतं. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली होती.