मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय करत जितेंद्रने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. जितेंद्र जोशीने लेकीच्या वाढदिवसानिमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे.
जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लेकीच्या जुन्या फोटोंचा एक कोलाज व्हिडीओ तयार केला आहे. त्या व्हिडीओत त्याने तिच्या बालपणासह विविध फोटोंची झलक दाखवली आहे.
आणखी वाचा : “माझे वडील…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…
जितेंद्र जोशीची पोस्ट
“बाळ माझं मोठं होतंय
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥
– तुकोबारायबघता बघता 13 गेली सुद्धा !!
परमेश्वराची कृपा असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे दर दिवशी या मुलीला पाहताना वाटतं. तिला मिळालेली स्वतंत्र बुद्धी, निरागस हास्य आणि अशक्य जिज्ञासू वृत्ती कायम तिच्या सोबतीला असू देत. संतांच्या अभंगांचा स्पर्श विवेकाला होऊ देत आणि आरतीप्रभू म्हणतात त्याप्रमाणे कवितेतील, जगण्यातील, स्वतः आणि इतरांमध्ये असलेल्या विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडू देत.बाकी काही असेल, नसेल तरी ठीक परंतु स्वतः शी छान मैत्री होऊ देत”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.
जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याच्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र जोशीच्या मुलीचे नाव रेवा असे आहे. काही आठवड्यांपूर्वी जितेंद्र जोशीने लेकीबरोबर लंडनवारीही केली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओही त्याने शेअर केले होते.