अभिनेता जितेंद्र जोशीनं त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी कलाकृतीची दखल घ्यायला लावणाऱ्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. नुकताचा हा समारंभ संपन्न झाला असून जियो स्टुडिओजने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या चित्रपटातील जितेंद्र जोशी याची निशी ही भूमिका त्याने त्याच्या लाडक्या मित्राला म्हणजेच निशिकांत कामतला समर्पित केली आहे. मध्यंतरी सोशल मीडिया पोस्टच्या मध्यमातून त्याने याबद्दल सांगितलंदेखील होतं.

आणखी वाचा : बोल्डनेसमुळे चर्चेत असणारी हंसिका मोटवानी लवकरच अडकणार विवाहबंधनात; इथे पार पडणार सोहळा

‘गोदावरी’च्या या ट्रेलरमध्ये एका सामान्य कुटुंबाची गोष्ट आपल्यासमोर उलगाडतान दिसत आहे. रोजच्या जगण्यातील संघर्ष आणि कौटुंबिक नाट्य एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडायचा प्रयत्न दिग्दर्शक निखिल महाजन यांनी केला आहे. अबोल नात्यांच्या, अव्यक्त भावनांच्या व्यक्त होण्याचा प्रवास, खळाळत्या नदीसोबत उलगडताना आपल्याला बघायला मिळणार आहे. चित्रपटाची मांडणी गंभीर असली तरी काही प्रसंग हलक्या फुलक्या पद्धतीनेही मांडले गेले आहेत.

या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. निखिल महाजन यांनी याआधी ‘जून’, ‘बाजी’ ‘पुणे ५२’ अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए.व्ही.प्रफुल्लचंद्रा यांच्या खांद्यावर आहे. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार चित्रपटगृहात येऊन बघावा अशी विनंती चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor jitendra joshi starrer upcoming film godavari trailer released avn