विनोदाचे बादशाह, हुकमी एक्के अशी ओळख असलेले अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. या दोघांचीही प्रमुख भूमिका असलेला ‘पांडू’ हा चित्रपट प्रचंड गाजला. आता ‘पांडू’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने याचे संकेत दिले आहेत.

दिग्दर्शक विजू माने यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “मी मेल्यानंतर…”; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

“मला फोटो काढायला खूप आवडतं. especially portraits. एकेक चेहरा ईश्वराची एकेक गोष्ट असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यात मला एक सिनेमा दिसतोच. कधीतरी ह्या चेहऱ्यांच्या गोष्टी तुम्हाला शेयर करेन म्हणतो. दिवाळीत मी खूप लोकांचे फोटोस काढलेत . खूप गोष्टी पोतडीत जमा झाल्यात. त्यातला हा पहिला stock”, असे विजू माने यांनी म्हटले आहे.

विजू माने यांनी शेअर केलेल्या फोटोतील पहिला फोटो हा कुशल बद्रिकेचा आहे. यावर कमेंट करताना कुशलने “तुम्हाला सिनेमा दिसतोय ना बस्स, मी भाऊला घेऊन येतो. पांडू २ करुयात”, असे म्हटले आहे. त्यावर विजू मानेंनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

kushal badrike comment
कुशल बद्रिकेची कमेंट

आणखी वाचा : ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीने घेतली आलिशान गाडी; फोटो शेअर करत म्हणाली…

विशेष म्हणजे कुशलने ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत ‘पांडू २’ बद्दल एक कमेंट केली आहे. “ही पोस्ट म्हणजे पांडू २ ची घोषणा समजायची का मग?” असा प्रश्न विजू मानेंना विचारला आहे. त्यावर विजू मानेंनी “आता तू म्हणतोयस तर… करुयात चल”, असे म्हटले आहे.

kushal badrike viju mane pandu 2
कुशल बद्रिकेच्या कमेंटवर विजू मानेंची प्रतिक्रिया

दरम्यान विजू माने लिखित आणि दिग्दर्शित तसेच झी स्टुडिओज निर्मित असलेला ‘पांडू’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात भाऊ कदम हे’ पांडूच्या भूमिकेत झळकले. तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत पाहायला मिळाले. या चित्रपटाने प्रेक्षकांनी मनं जिंकून घेतली.