छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. याच कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल बद्रिके हा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत तो झळकत आहे. नुकतंच त्याने या चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या एका संदर्भामुळे तो चर्चेत आला आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामर त्याच्या पात्राचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात त्याच्या पात्राचे काही पाहायला मिळत आहेत. “स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा”, अशा आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती. त्यावर आता एका चाहत्याने कमेंट केली आहे.
आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“दादा तुमचा पूर्णपणे आदर करून एक सांगतो की तान्हाजीराव घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढुन गेले याची कुठेच नोंद नाही, त्यांच्या फौजेत घोरपडे नावाचे दोन भाऊ होते जे कडे चढण्यात पटाईत होते अशी नोंद कुठेतरी सापडते पण घोरपडीला दोर लावून चढले ही दंतकथा”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर कुशलनेही प्रतिक्रिया दिली आहे.

“बरोबर आहे तुमचं , पण वाक्यप्रचार तसा वापरला जातो ना ! म्हणून म्हंटल”, अशा शब्दात कुशलने त्या चाहत्याला प्रतिक्रिया दिली आहे.

kushal badrike
कुशल बद्रिकेची पोस्ट

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यावर त्या चाहत्याने कुशलला टॅग करत “नक्कीच.. आताच चित्रपट पहायला जातोय…. मराठ्यांचा इतिहास घरा घरात पोहचवण्याचं कार्य असंच तुमच्या हातून घडत रहावं हीच त्या रायगडीच्या देवा चरणी प्रार्थना”, अशी कमेंट केली आहे. त्यावर कुशलने स्माईली आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे.

kushal badrike 2
कुशल बद्रिकेची पोस्ट

आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

दरम्यान ‘रावरंभा’ या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. तर अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

Story img Loader