झी टॉकीज या वाहिनीवरील झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळा नुकतंच पार पडला. या सोहळ्यात अनेक विनोदी नाटक, चित्रपट, पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांच्या बहुचर्चित पांडू चित्रपटाला ८ पुरस्कार मिळाले. या निमित्ताने नुकतंच अभिनेता कुशल बद्रिकेने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांन दिग्दर्शक विजू माने यांचे कौतुक केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने पांडू चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
कुशल बद्रिकेची इन्स्टाग्राम पोस्ट
“आपल्या नकळत कधी कधी आपल्याकडून अशा काही कलाकृती घडून जातात, ज्या पुढे कायम प्रेक्षकांना आनंद देत राहतात.
आमच्या “पांडू” या सिनेमाला प्रेक्षक पसंती सिनेमा म्हणून गौरव केल्याबद्दल “झी टॉकीज” तुमचे मनापासून आभार.
“विजू माने” सर तुम्ही best director award deserve करताच, पण त्याही पलीकडे या सिनेमासाठी तुम्ही काय, काय पणाला लावलंत याचा मी साक्षीदार आहे. “सिनेमासाठी वाटेल ते करणारी तुमच्यासारखी वेडी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत सिनेमाला मरण नाही”झी स्टुडिओ आमच्यावर विश्वास ठेवून, ही संधी दिल्याबद्दल मनापासून आभार. तुमच्या प्रत्येक “premier” ला तुम्ही आम्हाला आवर्जून बोलवता आणि आमचे फोन उचलता ते मिस झाले तर कॉल बॅक ही करता, शिवाय दिवाळीचे gift सुद्धा पाठवता, यातून “पांडू” हा सक्सेसफुल सिनेमा असून तो प्रॉफिट मध्ये गेला हे आलंच!!
आणि सगळ्यात शेवटी जसं “मोरया रे.. मोरया रे… म्हटल्याशिवाय आरती पूर्ण होऊ शकत नाही, तसंच आमचे मित्र संदीप वेंगुर्लेकर आणि डॉ. समीर भारती दादा तुम्हाला थँक्यू म्हटल्याशिवाय हे आभार सत्र संपवता येणार नाही तुमच्याशिवाय हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नसता.मायबाप प्रेक्षकहो, तुम्ही “पांडू” च्या निमित्ताने आम्हाला खूप प्रेम दिलंत तुम्हाला थँक्यू म्हणून तुमच्या ऋणांतून स्वतःची सुटका करून घेणार नाही मला उभा जन्म तुमच्या उपकारात राहायचं आहे. लवकरच सिनेमा घरात भेटू तोपर्यंत आम्हाला कुठे बघायचं ते तुम्हाला माहित आहेच… आजचा दैदिप्यमान सोहळा बघायला विसरू नका, दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर. #ZeeTalkiesComedyAwards मध्ये ‘पांडू’ ने पटकावले 8 पुरस्कार”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली
आणखी वाचा : ‘तू मावा खातोस का?’ विचारणाऱ्याला अभिनय बेर्डेचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला “मी…”
दरम्यान अवधूत गुप्ते यांच्या संगीताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. या चित्रपटाची दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. त्यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम हे पांडू आणि महादू या पोलीस हवालदाराच्या भूमिकेत दिसले होते.