विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून अभिनेता कुशल बद्रिकेला ओळखले जाते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. कुशल हा लवकरच ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

कुशल हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या एका आगामी चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. कुशल बद्रिके ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
आणखी वाचा : कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत, ‘या’ आगामी ऐतिहासिक चित्रपटातील लूक प्रदर्शित, म्हणाला…

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta lokankika competition
लोकसत्ता लोकांकिका : विभागीय अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड, आपल्या भागातील विषय मांडणीला प्राधान्य
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या पात्राचा एक लूक शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने एक पोस्टही शेअर केली आहे.

“खरतर ऐतिहासिक सिनेमां मध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचा” एखादा “मावळा” व्हावं आणि स्वराज्याच्या लढ्यात आपण स्वतःला झोकून द्याव असं प्रत्येक मराठी नटाचं स्वप्न असतं, पण “राव-रंभा” ह्या सिनेमात माझ्या नशिबात हा कुरबत खान आला, माझे दिग्दर्शक अनुप जगदाळे सर यांना माझ्यात हा कुरबत दिसला आणि मग नव्या सिनेमाचा प्रवास सुरु झाला,

प्रत्येक नवा सिनेमा काहीतरी शिकवून जातो , एक नवीन जीवन, नवीन अनुभव देऊन जातो, मी माझी भूमिका प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला पण तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं”, असे कुशलने यात म्हटलं आहे.

आणखी वाचा : ‘मराठी सिनेसृष्टीतील तुझी क्रश कोण?’ वैभव तत्त्ववादी म्हणाला “त्या भेटल्या की…”

दरम्यान ‘रावरंभा’ हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रदर्शित होत आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. या चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत कुशल बद्रिके झळकणार आहे.

Story img Loader