मराठी सिनेसृष्टीतील टॉप १० अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे शिवानी सुर्वे. मराठीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत ती कायमच आघाडीवर असते. शिवानी ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. नुकतंच शिवानीने तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिके हा इन्स्टाग्रामवर सक्रीय असतो. तो कायमच विविध पोस्ट करताना दिसतो. नुकतंच कुशलने इन्स्टाग्रामवर शिवानी सुर्वेचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देताना त्याने शिवानीच्या स्वभावाबद्दलही सांगितले आहे.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

कुशल बद्रिकेची पोस्ट

“Big-boss ह्या कार्यक्रमातून दिसलेली स्वतःच्या हक्कांसाठी राडा घालणारी, “शिवानी” आणि सिनेमाच्या shooting च्या निमित्ताने मला भेटलेली, प्रेमळ, मस्तीखोर, सतत नव्याच्या शोधात असलेली आणि जगाचे नियम मोडून आनंदी राहण्याची धमक असलेली. “शिवानी” ह्या दोन्हीही तिच्याच personality आहेत.

आता ते आपल्या वागण्यावर depend करतं की कोणती शिवानी आपल्याला भेटणार. पण एक गोष्ट महत्त्वाची की तिच्या दोन्ही personality खऱ्या आहेत, तिला फार काही खोटं वागता येत नाही. जे पोटात तेच ओठात ! जगात खूप कमी माणसं अशी आहेत. शिवानी सुर्वे आहेस तशीच रहा कायम. Happy birthday yaar (थोडंस्स उशिरा]”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर…”, क्रांती रेडकरच्या लेकीला गंभीर दुखापत, म्हणाली “अजूनही चालायला…”

दरम्यान कुशलच्या या पोस्टवर शिवानी सुर्वेने कमेंट केली आहे. “कुशल बद्रिके खूप खूप धन्यवाद. किती छान बोललास तू, परत एकदा धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया शिवानी सुर्वेने दिली आहे. सध्या कुशलची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Story img Loader