एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र असलेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता ललित प्रभाकरने भाष्य केले आहे.

ललित प्रभाकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी त्याने मराठी चित्रपटाबद्दल एक खंतही सांगितली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”

amruta khanvilkar birthday and age
किती वर्षांची झाली ‘चंद्रा’? ‘ढेर सारा प्यार’ म्हणत पती हिमांशूने दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला…
Smita Tambe
“जिजा १५ वर्षे…”, मराठी अभिनेत्रीने मतदान केल्यानंतर सांगितला…
gautami patil share video with alka kubal sai tamhankar and shiv thakare
Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा
Deepti Lele
“मी ट्रेनमध्ये बसले होते, शेजारची मुलगी…”, अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाली, “मला लाज वाटते सांगायला…”
no alt text set
‘या’ मराठी चित्रपटासाठी तीन दिग्गज गायकांनी पहिल्यांदाच एकत्र केलं पार्श्वगायन; सिनेमा पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

“मी आताच ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिला. आशिष बेंडे या माझ्या जवळच्या मित्राने तो दिग्दर्शित केला आहे. पण तो माझा मित्र आहे, म्हणून मी हे लाईव्ह करत नाही. मी बऱ्याच वर्षांनी इतका चांगला चित्रपट पाहिला. या चित्रपटानंतर मी मराठी चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.

आशिष हा माझा मित्र आहे. या चित्रपटाचे सर्व राज्यात, परदेशात आणि ठिकठिकाणी कौतुक होतं आहे. हा चित्रपट संपेपर्यंत आम्ही तो पाहिला. त्यावेळी आम्ही हसलो, एन्जॉय करत होतो. त्यामुळे तुम्ही आवर्जुन हा चित्रपट बघा”, असे आवाहन ललित प्रभाकरने केले.

“आपल्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तितका खर्च केला जात नाही. त्यासाठी बजेट मिळत नाही. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की, आपल्याला एखादी गोष्ट जर आवडली असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे कृपया हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला एक पैशाचा पश्चात्ताप होणार नाही. एक सेकंदही बोअर होणार नाही”, असेही ललित प्रभाकर म्हणाला.

आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसते. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.