महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आज (२६ एप्रिल) अखेर ‘जुनं फर्निचर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पोटच्या लेकराला आई-वडील तळहाताच्या फोडासारख जपतात. पण उतारवयात जेव्हा त्यांना मुलांची अधिक गरज भासते, तेव्हा मुलं पाठ फिरवतात. करिअर व स्वतःच्या आयुष्यात व्यग्र होतात अन् आई-वडील हळूहळू त्यांच्या नजरेआड होऊ लागलात. अशा वेळी आई-वडिलांना होणारा त्रास, अस्वस्था या चित्रपटातून पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलाच्या बेजबाबदारपणामुळे आईचा जीव गेल्याचा गंभीर आरोप करत अस्वस्थ वडील न्यायालयाचे दार ठोठावतो. त्यानंतर ४ कोटी ७२ लाख ६ हजार शंभर रुपये नुकसान भरपाईची मागणी मुलाकडून करतो. मग न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देतं, हे पाहणं रंजक आहे. तसंच चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. या क्लायमॅक्समुळे ३६० अंशाचा चित्रपटात बदल होतो. अशा या उत्तम कथानक असलेल्या चित्रपटात एक प्रसिद्ध अभिनेता हुबेहूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकला आहे.

हेही वाचा – Video: सागर सावनी-कार्तिकचा डाव उधळून लावणार, मुक्ताला पुराव्यानिशी सर्वांसमोर निर्दोष सिद्ध करणार

‘जुनं फर्निचर’ चित्रपटात स्वतः महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, गिरीश ओक असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय चित्रपटात छोट-छोट्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेते झळकले आहेत. शिवाजी साटम, शरद पोंक्षे, ओंकार भोजने असे बरेच कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाले.

अभिनेते मकरंद अनासपुरे देखील ‘जुनं फर्निचर’ झळकले. त्यांनी एका मंत्र्याची भूमिका साकारली असून त्यांचा हुबेहूब लूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा पाहायला मिळाला. भरगच्च दाढी, कपाळावर ढिळा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये मकरंद अनासपुरे दिसले.

हेही वाचा – “तुझ्यासारखा तूच चिन्मय…”, नेहा जोशी-मांडलेकरने नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

महेश मांजरेकर ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाबद्दल म्हणतात, “जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरुणाने आपल्या पालकांबरोबर हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.”