बालकलाकार म्हणून ज्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि पुढे अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले, ते अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी हे होय. ‘हम बच्चे हिंदुस्तान के’ या बालचित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘सवतीचं कुंकू’, ‘पारख नात्यांची’, ‘मैत्री जीवांची’, ‘अथांग’, ‘ठण ठण गोपाळ’, ‘हक्क’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले. सध्या मिलिंद गवळी हे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे.

पोस्ट शेअर करत काय मिलिंद गवळी?

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ‘हौसेने केला पती’ या चित्रपटाचे शूटिंग करताना काय झाले होते, याचा किस्सा सांगितला आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री तेजा देवकर प्रमुख भूमिकेत दिसली होती. मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर करताना लिहिले, “हौसेने केला पती या सिनेमामध्ये माझ्याबरोबर हिरोईन होती तेजा देवकर. नाशिकला एका छानशा लोकेशनवर पंधरा दिवसांचं शूटिंग करून मी मुंबईला घरी परत आलो. माझ्याव्यतिरिक्त बाकीचे सीन्स शूट करण्यासाठी युनिट नाशिकमध्येच होतं. चार-पाच दिवसांनंतर मला तेजा देवकरचा नाशिकवरून फोन आला. ती घाबरली होती, खूप चिडली होती, संतापली होती. मी विचारलं, “नेमकं काय झालंय?” तर समजलं की, तेजा देवकरला नाशिकमध्येच सोडून सगळं युनिट निघून गेलं होतं. त्या सिनेमाच्या प्रोड्युसरचा काहीच पत्ता लागत नव्हता. ज्या हॉटेलमध्ये नाशिकला तिला उतरवलं होतं. त्या हॉटेलचं बिलसुद्धा त्यांनी भरलं नव्हतं. तिला काही सुचत नव्हतं काय करायचं?

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
raveena tandon 8 movies hit in a year
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Marathi writer actress Madhugandha Kulkarni post viral
“ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…
Juhi Chawala
जुही चावला बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री! चित्रपटांपासून दूर असूनही कसे कमावते पैसे? उत्पन्नाचा स्रोत काय? घ्या जाणून…
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

“नशिबानं त्या सिनेमामध्ये माजी मंत्री बबनराव घोलप हे तेजा देवकरच्या वडिलांची भूमिका करीत होते. माझा आणि त्यांचा खूप आधीपासूनचा चांगला परिचय होताच. त्यांच्या पहिल्या सिनेमांमध्ये म्हणजे ‘नीलांबरी’ मध्ये मी नायक होतो. मी त्यांना फोन करून सगळी हकीगत सांगितली. त्यानंतर त्यांनी तेजा देवकरला मुंबईला घरी पोहोचण्यासाठी मदत केली.”

इन्स्टाग्राम

“कल्पना करा की, जे कलाकार बाहेरगावी शूटिंग करतात आणि अचानक आपल्याला काही न कळवता सगळे गायब होतात, त्या कलाकाराची अवस्था काय होत असेल? त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते साताऱ्याचे दाऊद शेख. याआधी त्यांनी माझ्याबरोबर एका सिनेमामध्ये ‘सूर्योदय’मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मी त्यांना फोन केला, तेव्हा मला कळलं की, प्रोड्युसरकडचे पैसे संपले होते म्हणून तो पळून गेला. बरं गोष्ट इथे थांबत नाही, खरी गंमत तर काही महिन्यांनंतर झाली. एक दिवस दाऊद आणि तो प्रोड्युसर मुंबईत मला भेटायला आले. उरलेला सिनेमा आपल्याला पूर्ण करायचा आहे, असं त्यांनी मला सांगितलं.”

“मी त्यांना म्हटलं की तुम्ही तेजा देवकरच्या घरी जाऊच नका. तिची आई वकील आहे. ती तुमच्यावर केसच ठोकेल. तेजा तर हे लोक तिला परत कधी भेटतात याची वाटच बघत होती; पण तरीही मी मध्यस्थी करायचं ठरवलं. कारण- माझ्यासाठी ‘सिनेमा’ नेहमीच महत्त्वाचा होता. मी तेजाला फोन केला, सुरुवातीला ती म्हणाली, ‘त्यांच्याबरोबर परत काम करणं या जन्मात शक्य नाही.’ नंतर माझ्या विनंतीला मान देऊन, ती काम करायला तयार झाली. उरलेला सिनेमा साताऱ्यामध्ये पूर्ण केला. हा खूप कमी बजेटचा सिनेमा होता.”

“त्यानंतर मी ‘दुर्गा म्हणत्यात मला’ हा अडीच-तीन कोटींचा सिनेमा केला. त्याच्या प्रीमियरला साताऱ्याच्या पुसेगाव यात्रेला गेलो. तिथे हा ‘हौसेने केला पती’सुद्धा लागला होता आणि तो ‘दुर्गा म्हणत्यात मला’पेक्षाही तुफान चालत होता. प्रत्येक सिनेमा हे आपलं नशीब घेऊन येत असतो हे काय खोटं नाहीये.”, अशी पोस्ट लिहीत मिलिंद गवळी यांनी चित्रपटाबद्दलची आठवण सांगितली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी अभिनेत्री तेजा देवकरला टॅग करत काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धच्या भूमिकेतूनदेखील मिलिंद गवळी यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अनिरुद्धची विविध रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळाली. काही वर्षांपासून मनोरंजन करणारी ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.