मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा चाहता वर्ग असलेले अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी अनेक उत्कृष्ट कलाकृती सिनेसृष्टीला दिल्या आहेत. नाना पाटेकरांनी अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा प्रसिद्ध नाना पाटेकरांनी नुकतीच ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्ट सांगितल्या. तसंच मोठ्या लेकाच्या मृत्युबद्दल त्यांनी मौन सोडलं. त्याच्या आठवणीत खुलेपणाने बोलत ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकरांनी मुलाखतीमध्ये आधी आपल्या आईविषयी सांगितलं. ते म्हणाले, “आपल्या आईबद्दल काय बोलावं; तिच्यामुळेच आज अस्तित्वात आहे. आईकडील सर्व लोक अंडरवर्ल्डमधील होते. माझ्या मामाचाही अंडरवर्ल्डशी संबंध होता. मी तसा होऊ नये म्हणून आई मला घेऊन गावी गेली. जेणेकरून मी अंडरवर्ल्डमध्ये जाऊ नये.”

हेही वाचा – रस्त्यावर वडापाव विकून चंद्रिका दीक्षित एका दिवसाला कमावते ‘इतके’ पैसे, आकडा वाचून व्हाल थक्क

यानंतर नाना पाटेकरांनी मोठ्या लेकाच्या निधनाविषयी सांगितलं. ते म्हणाले, “मोठा मुलगा जन्मपासूनच आजारी होता. त्याला बरंच काही होतं. एका डोळ्याची समस्या होती, त्याला दिसत नव्हतं. मी त्याचा इतका तिरस्कार करू लागलो होतो की, त्याला पाहताच मी हा विचार करायचो की लोक काय म्हणतील. नाना पाटेकरचा मुलगा कसा आहे. पण त्याला काय वाटतं, कसं वाटतं याचा विचार मी केलाच नाही. माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील, याचाच मी नेहमी फक्त विचार केला. त्याचं दुर्वासा नाव होतं. त्यानं आमच्याबरोबर अडीच वर्ष घालवलं आणि त्यानंतर त्याचं निधन झालं. पण काय करणार? आयुष्यात काही गोष्टी घडतात.”

हेही वाचा – Video: लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या सोनाक्षी सिन्हासाठी मल्लिकाजान मनीषा कोईरालाने दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ आला समोर

नाना पाटेकरांनी मोठ्या लेकाचं नाव अत्यंत क्रोधित ऋषी दुर्वासा यांच्या नावावरून ठेवलं होतं. पुढे नाना यांनी पत्नी नीलकांती यांच्याशी झालेल्या भेटीविषयी सांगितलं. अभिनेते म्हणाले, “एका नाटकादरम्यान नीलकांती यांच्याशी भेट झाली होती. तिकडे त्या एक बँक ऑफिसर होत्या आणि त्यांना अडीच हजार रुपये पगार मिळायचा. नानांना नीलकांतीनेच नाटकात काम करण्याची परवानगी दिली होती. जेणेकरून नाटकातूनही पैसे कमावता येईल.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor nana patekar talks about his elder son death pps