‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात दिसला. मालिकांप्रमाणे नुकताच तो सरला एक कोटी’ चित्रपटात दिसला होता. आता तो पुन्हा एकदा मोठया पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
ओंकार भोजने आता दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘कलावती’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे मराठीतले आघाडीचे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. अमृता खानविलकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. पहिल्यांदाच तो अमृताबरोबर काम करत आहे. त्यावर तो असं म्हणाला, “मी असा कधी विचार केला नव्हता, कारण मी ज्यांना बघत वाढलो ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी स्ट्रगल करावा लागायचा आता त्यांच्याच चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करत आहे हे खूप वेगळं आहे, शब्दात मांडत येण्यासारखं नाही. तसेच मी हे जपून ठेवेन आणि याचा कामावर चांगला परिणाम होईल याकडे लक्ष देईन.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
‘बिग बॉस’ फेम अक्षयबरोबरच्या नात्यावर समृद्धी केळकरने अखेर केला खुलासा; म्हणाली, “मी त्याची…”
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिष दुधाणे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे आणि युट्यूबर नील सालेकरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘कलावती’ चित्रपटाचं पोस्टर आणि त्यातून दिसणारी अमृता खानविलकरची झलक प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. एकूणच हा चित्रपट भव्य असणार यात काहीच शंका नाही. नेटकऱ्यांनी यासाठी संजय जाधव आणि अमृता खालविलकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.