ज्येष्ठ व हुरहुन्नरी अभिनेते सतीश कौशिक यांचं गुरुवारी ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त करत आहेत. अभिनेते व कवी किशोर कदम यांनीही एक फेसबूक पोस्ट लिहून सतीश कौशिक यांच्याबरोबर नाटकात काम केल्याचा अनुभव सांगितला आहे.

Video: “मृत्यू जीवनाचा शेवट आहे, नात्यांचा…” सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

किशोर कदम यांनी सतीश कौशिक यांच्याबरोबर “सेल्समन रामलाल” या नाटकात काम केलं होतं. किशोर कदम यांनी मुलाची तर सतीश कौशिक यांनी वडिलांची भूमिका या नाटकात साकारली होती. त्यावेळच्या शूटिंगच्या आठवणींना किशोर कदम यांनी पोस्टमधून उजाळा दिला आहे. तसेच त्यांचं वडिलांशी असलेलं नातं आणि एका चित्रपटातील शूटिंग प्रसंग याचं भावनिक वर्णन त्यांनी या माध्यमातून केलं आहे. “मला माझाच बाप गेल्या सारखं वाटतंय…” असं सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल लिहिताना किशोर कदम यांनी म्हटलं आहे.

किशोर कदम यांनी अत्यंत भावूक पद्धतीने मांडणी करत त्यांचे अनुभव सांगितले आहेत. “सतीशजी भेटले होते मध्यंतरी..त्यांना मारायला पाहिजे होती मिठी..म्हणायला पाहिजे होतं..its all right सतीशजी… आपण सगळेच … वास्तव न स्वीकारणारे.. स्वप्नांच्या मागे धावणारे विली लोमन असतो,” असं किशोर कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सतीश कौशिक यांना गुरुवारी हृदयविकाराचा धक्का आला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Live Updates
Story img Loader