आयसीसी टी -२० वर्ल्डकपमध्ये भारताने गुरुवारी अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकून टीम इंडियाने पहिल्या गटातील गुणतालिकेत आपलं खातं उघडलं आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने त्यांना १८१ धावांचं आव्हान दिलं होतं. हे लक्ष्य पार करताना अफगाणिस्तानचा संघ १३४ धावांवर बाद झाला.

भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत असला तरीही भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचं फॉर्ममध्ये नसणं ही गोष्ट भारतासाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात सुद्धा रोहित-विराटने सावध सुरुवात केली होती. परंतु, दोघेही लवकर बाद झाले. या दोघांच्या फॉर्मबद्दल आता क्रिकेटविश्वातील विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याशिवाय मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने सुद्धा विराट-रोहितच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”

हेही वाचा : Video : खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी-झहीरची लग्नाआधी घेतली भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्…

मराठी अभिनेता आस्ताद काळेने सध्या चालू असलेल्या टी -२० वर्ल्डकपबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने परदेशातील खेळाडूंचं कौतुक केलंय तर, विराट-रोहितच्या कामगिरीबद्दल त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत याची तुलना आयपीएलशी केली आहे. आयपीएलमध्ये धावांचा धुमाकूळ घालणाऱ्या रोहित-विराटला आता काय झालंय असं त्याला पोस्टद्वारे सुचित करायचं आहे.

हेही वाचा : Video : मराठमोळ्या ऋतुजा बागवेचा हिंदी अभिनेत्यासह ‘पुष्पा’ स्टाइल जबरदस्त डान्स! ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकले

“यंदाच्या आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल वगैरे काही इतरदेशीय खेळाडू सपशेल नापास झाले होते. तिथेच विराट आणि रोहित धुमाकूळ घालत होते. पण, आयसीसी टी -२० वर्ल्डकपमध्ये…” अशी पोस्ट आस्ताद काळेने शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लवकरच विराट-रोहितचा फॉर्म आधीसारखा होऊदे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा : दोन घटस्फोट अन् बिपाशा बासूशी तिसरं लग्न करण्याबाबत करण सिंग ग्रोव्हरने सोडलं मौन; म्हणाला, “जे झालं ते…”

aastad kale
टी-२० वर्ल्डकपबद्दल आस्ताद काळेची पोस्ट

दरम्यान, आस्ताद काळेसह अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावर नेहमीच क्रिकेट विश्वाबद्दल आपलं मत मांडत असतात. प्रथमेश परब, हृषिकेश जोशी यांसारख्या अभिनेत्यांच्या क्रिकेटबद्दलच्या पोस्ट नेहमीच लक्ष वेधून घेतात. आता भारताची ‘सुपर आठ’ मधली पुढची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

Story img Loader