महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात राज्य केले. नाटक, मालिका किंवा चित्रपट, या सर्वच माध्यामातील भूमिकांमुळे तो घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून तो महापरिनिर्वाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो पाठमोरा दिसत आहे. त्याच्या शर्टावर काहीतरी डाग लागल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुसळधार पाऊस पडतानाही दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्याने या चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात रिंकू राजगुरु साकारणार ‘हे’ पात्र, नवीन पोस्टर आलं समोर

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन

प्रसाद ओकची पोस्ट

“महापरिनिर्वाण”
आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंगचा प्रवास संपला..!!
माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार..!! माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे… तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं…!!! फुलवा… तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली…!!!

नितीश नांदगावकर… फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर… एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं…!!! वा…!!! वा…!!! माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम…!!! दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर
छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर… तुमच्या कष्टांचं कौतुक करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे… इतकं perfect काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात…!!!
हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला, त्याचं श्रेय संपूर्ण टीम ला…!!!, असे प्रसाद ओकने म्हटले.

आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असं म्हटलं जातं. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचं निर्वाण झालं. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण होता. या क्षणावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.