Maharashtra Vidhansabha Results 2024 Marathi Actors Post : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पहिल्या फेऱ्यांमध्ये महायुतीला मोठा विजय मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील जवळपास २०० हून अधिक जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार सद्यस्थितीला जवळपास ५० ते ६० जागांवर आघाडीवर आहेत. या निकालांवर आता राजकीय क्षेत्रासह मनोरंजन विश्वातून सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस विजयी झाल्यावर अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालं. अभिजीतप्रमाणे ‘बिग बॉस’ विजेती लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडेने सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं जुनं भाषण इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री मेघा धाडेची पोस्ट ( megha dhade )

हेही वाचा : “सूर्य पुन्हा एकदा तळपला…”, देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

अभिनेता उत्कर्ष शिंदेने बारामतीचे निकाल लागल्यावर अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे. अजित पवारांच्या विरुद्ध त्यांचे पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होते. मात्र, काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत काकांनी मोठ्या फरकाने बाजी मारली आहे.

अभिनेता उत्कर्ष शिंदेची पोस्ट

तसेच अभिनेता प्रसाद ओकने या निवडणुकीच्या निकालांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत दोन स्टोरीज शेअर केल्या आहेत. “जो हिंदू हित की बात करेगा… वही देश पर राज करेगा!!” तसेच यापूर्वीच्या स्टोरीमध्ये प्रसादने, “धर्मो रक्षति रक्षित: हिंदू ऐक्य चिरायु होवो” असं म्हटलं आहे.

अभिनेता प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : Eknath Shinde : महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लाडक्या बहिणी…”

दरम्यान, राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार? यापैकी महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसून येत आहे.