अभिनेता प्रसाद ओक हा नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांपासून अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात त्याच्या नावाचा डंका आहे. उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपट करत असल्यामुळे प्रसादला प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळत आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्यासाठी २०२४ची सुरुवात खूप खास आहे. कारण या नवीन वर्षाची सुरुवात ओक कुटुंबाने नव्या घरातून केली आहे. नव्या घराची पहिलीच झलक प्रसादने नुकतीच दाखवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता प्रसाद ओकने काल, वर्षा अखेरीस आपल्या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. “वर्षाच्या अखेरीस…नवी सुरुवात…नवा चित्रपट ‘रीलस्टार'”, लिहित प्रसादने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आज वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसादने आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात ओक कुटुंबाने नव्या घरातून केली आहे. नुकताच प्रसादने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून त्यातून नव्या घराची पहिली झलक दाखवली आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने दिला सुखद धक्का, साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाली, “आम्ही…”

प्रसादने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ओक कुटुंबाच्या नव्या घराचं प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे. तसेच घराबाहेरील आकर्षित नेमप्लेट दिसत आहे. डिस्टेंस इंडिकेटरवर ‘ओक ११०२/११०३’ असं लिहिण्यात आलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या घरात होत असल्यामुळे प्रसादसह पत्नी मंजिरी ओक आणि दोन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

प्रसादच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह त्याच्या चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, प्रियदर्शनी इंदलकर, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे, अश्विनी कासार, प्रियांका बर्वे, सावनी रविंद्र अशा अनेक कलाकारांनी ओक कुटुंबाचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा – “फक्त कामासाठी आपली मराठी…”, ‘तारक मेहता…’ मधील भिडेंच्या हिंदी व्हिडीओवर चाहत्याची प्रतिक्रिया, अभिनेते म्हणाले…

दरम्यान, प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, या वर्षात त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘धर्मवीर २’, ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ , ‘रीलस्टार’ असे बरेच प्रसादचे चित्रपट या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor prasad oak share new home video on instagram pps