अभिनेता प्रसाद ओकला त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जाते. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच प्रसादने टॅक्सबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर रिल शेअर केला आहे. यात त्याची पत्नी मंजिरीही दिसत आहे. यावेळी मंजिरी ही मेकअप करताना दिसत आहे. प्रसादने एका जुन्या गाण्यावर रिल व्हिडीओ तयार केला आहे. “कमता हूँ बहोत कुछ पर, कमाई डुब जाती है”, असे या गाण्याचे बोल आहे. यावर त्याने उत्तम अभिनय केला आहे.
आणखी वाचा : “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

या व्हिडीओ प्रसाद ओक हा डोक्यावर हात लावून उभा असल्याचे दिसत आहे. गाणं सुरु होताच तो गाण्याच्या ओळींवर आधारित विविध हावभाव करताना दिसत आहे. त्यानंतर तो मंजिरीकडे जातो, पण मंजिरी मात्र रागात त्याच्याकडे पाहताना दिसत आहे.

“सरकारनी ठरवलं तर टॅक्स कंट्रोल होऊ शकतो… पण बायको????????” असे कॅप्शन प्रसादने या व्हिडीओला दिले आहे. त्याने दिलेल्या या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रसाद ओकच्या त्या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. त्यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. प्रसाद ओकचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो ‘धर्मवीर २’ चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor prasad oak share reel video with manjiri oak talking about tax and wife expenses nrp