मराठी चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता गौरव मोरे हे दोघेही लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘परिनिर्वाण’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आणि व्यावसायिक कामानिमित्त प्रसाद आणि गौरव बऱ्याचवेळा एकत्र प्रवास करतात. गौरवसह प्रवास करताना आलेला अनुभव प्रसाद ओकने नुकताच एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.
हेही वाचा : तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं वास्तव; म्हणाल्या, “ब्लेडने दाढी केली तर…”
प्रसाद ओकने या व्हिडीओमध्ये प्रवासदरम्यान दिसणारा सुंदर निसर्ग आपल्या चाहत्यांना दाखवला आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तो लिहितो, “इतका सुंदर निसर्ग असतानाही मोबाइलमध्ये अडकलेली काही माणसं…गौरव मोरे असा कसा आहेस रे तू????” गौरव मोरे या व्हिडीओमध्ये मोबाइलमध्ये गुंतल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “‘जवान’ला ठरवून डोक्यावर घेतलं”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भ्रष्ट नेत्यांकडून…”
गौरव मोरेने आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रसादने हा खास व्हिडीओ त्याच्यासाठी शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने, “गौरव मोरे मोबाइलमध्ये रिल्स बघत असणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने, “गाडीतून उतरवा त्याला” अशी मजेशीर कमेंट या व्हिडीओवर केली आहे.
हेही वाचा : ‘या’ तीन निकषांवर ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची निर्माती श्रुती मराठे स्वीकारते काम; म्हणाली…
दरम्यान, अभिनेता गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाला. तो लवकरच एका हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव संगी असून यामध्ये शरिब हाशमी आणि विद्या माळवदे यांच्या मुख्य भूमिका असतील.