मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. प्रशांत दामले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक मालिका, चित्रपटामधून प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केलं. प्रशांत दामले यांना ‘नाटकाचे विक्रमादित्य’ म्हणूनही संबोधले जाते. आजही प्रशांत दामले यांचं नाटक हाऊसफुल्ल होते.
हेही वाचा- “बायको Happy Anniversary”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण! पत्नीला म्हणाला, “चिडक्या, भावुक…”
नुकतचं प्रशांत दामले यांनी ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत त्यांना “तुमच्या प्रसिद्धीच्या काळात तुमच्यामागे अनेक चाहत्यांची गर्दी होती, तर यावेळी तुमच्या पत्नीला तुमच्याविषयी कधी असुरक्षितता वाटली नाही का?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत प्रशांत दामले यांनी एक आठवण शेअर केली आहे.
प्रशांत दामले म्हणाले “हो नक्कीच. तिला असुरक्षितता वाटली असणार आणि पत्नी म्हणून ही असुरक्षितता असणे अत्यंत स्वाभाविकच आहे. पण आजवर तिने मला याबद्दल कधीही काहीही म्हटले नाही. मी लग्न झाल्यावर अभिनेत्री वर्षा उसगांवकरला उचलून घेतले होते. पण यावर तिने कधीही काहीही विचारलं नाही. या अशावेळी तुमच्या जोडीदारावर विश्वास असावा लागतो. आमच्या लग्नाला आतापर्यंत ३५ वर्षे झाली पण आजवर तिने कधीही मला याबद्दल एक प्रश्नही विचारला नाही.” प्रशांत दामले यांनी “सारखं काहीतरी होतंय” या नाटकात एकत्र काम केलं होतं.
प्रशांत दामले यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आत्तापर्यंत निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेत्री कविता लाड यांची प्रमुख भूमिका आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.