महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याविषयी पोस्ट शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीय अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आपल्या आगामी चित्रपटाची पोस्ट त्याने शेअर केली. ‘मुंबई लोकल’ असं प्रथमेशच्या आगामी चित्रपटाचं नाव असून अक्षय्य तृतीतयेला या चित्रपटाचा पोस्टर सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात प्रथमेशसह अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, अभिनेता पृथ्वीक प्रताप, मनमीत पेम झळकणार आहेत. अशातच सध्या प्रथमेशचा ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणेंबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिनेता प्रथमेश परबने किशोरी शहाणेंबरोबरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “Masti in-between वेगवेगळे shoots and वेगवेगळे sets…PS- अजिबात आळस न करता मनापासून केलेली Reel”, असं कॅप्शन लिहित प्रथमेशने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेलं ‘भाडीपा’चं गाणं ‘माझ्या नीट बोलायचं’ यावर प्रथमेश व किशोर शहाणे अभिनय करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

हेही वाचा – Video: “अंगावर काटे आले…”, स्पृहा जोशी व आदिनाथ कोठारेच्या ‘शक्तिमान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला, म्हणाले…

प्रथमेश व किशोरी शहाणेंच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सुंदर”, “अरे व्वा”, “मस्त”, “किशोरी शहाणे तुम्ही खूप गोड आहात”, अशा प्रतिक्रिया करत हार्ट इमोजी नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – ‘राजा रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत झळकणार, दोघांच्या अफेअरची रंगलेली चर्चा

दरम्यान, किशोरी शहाणेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या सध्या हिंदी मालिकेत काम करत आहेत. ‘झी टीव्ही’वरील ‘कैसे मुझे तुम मिल गई’ या हिंदी मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तसंच प्रथमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच त्याचा ‘होय महाराजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ३१ मेला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, अंकिता लांडे, असे बरेच कलाकार मंडळी झळकणार आहेत. या चित्रपटातील गाणी सध्या प्रदर्शित होतं आहेत. याशिवाय ‘ताजा खबर’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रथमेश पाहायला मिळणार आहे. अभिनेता भुवन बाम, श्रिया पिळगांवकर, महेश मांजरेकर अशा अनेक कलाकारांबरोबर प्रथमेशने ‘ताजा खबर सीझन २’मध्ये काम केलं आहे.

Story img Loader