मराठी मनोरंजनविश्वात सध्या अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. अलीकडेच अभिनेत्री सुरुची अडारकर, गौतमी देशपांडे, स्वानंदी टिकेकर, सोनल पवार, गायिका मुग्धा वैशंपायन अशा बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधली. आता येत्या काळात अनेक कलाकार संसार थाटताना दिसणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात प्रथमेश परब देखील सामील झाला आहे. हो, लवकरच प्रथमेश क्षितिजा घोसाळकर लग्नबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Premachi Goshta: बाथरुमवरून भांडण ते नाश्त्याला ऑम्लेट पाव..; ‘असा’ असणार मुक्ताचा सासरचा पहिला दिवस

‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रथमेश परबने गेल्या वर्षी प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून तो गर्लफ्रेंड क्षितिजाबरोबर अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू लागला. यामुळे प्रथमेश-क्षितिजा चांगलेच चर्चेत आले. नुकताच दोघांच्या केळवणाचा कार्यक्रम झाला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या प्रथमेश-क्षितिजाबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे. १४ फेब्रुवारी २०२४ला दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण दोघांची पहिली ओळख आणि पहिली भेट कुठे झाली? यांची अनोखी लव्हस्टोरी नेमकी काय आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – प्रथमेश परबची होणारी बायको आहे तरी कोण? काय करते काम?

प्रथमेश-क्षितिजाचा प्रेमविवाह आहे. इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. लवकरच प्रथमेश-क्षितिजाचं लग्न होणार आहे. यासाठी प्रथमेशचे चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान, प्रथमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा नवा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रथमेशच्या साथीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडेपाटील असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor prathamesh parab and kshitija ghosalkar lovestory pps