‘बालक पालक’, ‘टाइमपास’ अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रथमेश परब ( Prathamesh Parab ) काही दिवसांपूर्वी थायलंडला गेला होता. लग्नाचा पहिला वाढदिवस प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरबरोबर थायलंडमध्ये साजरा केला. या थायलंडच्या दौऱ्याचे प्रथमेश व क्षितिजाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. प्रथमेश परबने नुकतीच इन्स्टाग्रामवर बायको क्षितिजाच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.
मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये प्रथमेश परबने क्षितिजाचा ३०वा वाढदिवस साजरा केला. केक कापून अनोख्या अंदाजात क्षितिजाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमधील खास फोटो प्रथमेशने इन्स्टाग्रामवर शेअर करत क्षितिजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रथमेश परबने लिहिलं, “वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा बायको…तू किती ही वयाने मोठी झालीस तरी तुझ्यात दडलेलं लहान मुलं असंच जपून ठेव आणि मी ही ते कधीच मोठं होऊ देणार नाही…त्याचे नेहमीच लाड करत राहीन…माझी लाडूबाई.”
प्रथमेशच्या या खास पोस्टवर क्षितिजाने आभार व्यक्त केले आहेत. क्षितिजा म्हणाली, “मुला तुझे खूप खूप आभार. किती गोड लिहिलंय रे…खूप प्रेम.” प्रथमेश परबची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. दोघांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी खास उपस्थिती लावली होती. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
प्रथमेश परबच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘देवाचं घर’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संकेत माने दिग्दर्शित या चित्रपटात बालकलाकार मायरा वायकुळ मुख्य भूमिकेत झळकली होती. लवकरच तो हिंदी प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे.
प्रथमेशची बायकोबद्दल थोडक्यात…
प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसंच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितीजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.