मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब अखेर लग्नबंधनात अडकला. अनेक दिवसांपासून प्रथमेशच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर परवा (२४ फेब्रुवारी) त्याने प्रेयसी क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. जवळचे नातेवाईक व मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर अनेकांनी प्रथमेश व क्षितिजावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रथमेश व क्षितिजाच्या मेंदीपासून लग्नापर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये ही जोडी खूप सुंदर दिसत होती. या लग्नात क्षितिजा व प्रथमेच्या लूकची चर्चा चांगलीच रंगली होती. लग्नात क्षितिजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर गुलाबी रंगााचा शेला घेतला होता. तर, प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले होते. तसेच त्याने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. या लूकमध्ये दोघे खूप सुंदर दिसत होते.
हेही वाचा- साधं अन् सुंदर आहे प्रथमेश परबच्या बायकोचे मंगळसूत्र, ‘त्या’ खास डिझाइनने वेधलं लक्ष, पाहा फोटो
लग्नानंतर क्षितिजाचे सासरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रथमेशच्या घरी लग्नानंतरचे विधी पार पडले. क्षितिजाने सोशल मीडियावर याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये प्रथमेश व क्षितिजा अंगठी शोधण्याचा खेळ खेळताना दिसत आहेत. क्षितिजाने हा फोटो शेअर करीत प्रथमेशला टॅग केले आहे. तर, प्रथमेशनेही ही पोस्ट रिपोस्ट करीत क्षितिजाला टॅग केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘हे मिसेस परब’, असे लिहिले आहे.
हेही वाचा- मेहंदी रंगली गं! पूजा सावंतच्या हातावर सजली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, फोटो व्हायरल
प्रथमेश व क्षितिजाची इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा ओळख झाली. १४ फेब्रुवारी २०२० ला क्षितिजाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक फोटोशूटची सीरिज केली होती. ही सीरिज बघून प्रथमेशने क्षितिजाला पहिल्यांदा मेसेज केला होता. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता नुकतीच दोघांनी लग्नगाठ बांधत नव्या आय़ुष्याला सुरुवात केली आहे.