महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबला खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली आहे. त्यामुळे आता लवकरच अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. क्षितीजा घोसाळकर असं प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचं नाव असून नुकताच दोघांच्या केळवणाचा कार्यक्रम झाला. अभिनेत्याने स्वतः केळवणाचे फोटो शेअर करून ‘प्रतिजा’ ठरलं हा! बाकी तारीख लवकरच कळवतो, असं सांगितलं होतं. आता प्रथमेशचा केळवणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेता प्रथमेश परबने स्वतः केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जेव्हा केळवणाला तुमच्यापेक्षा तुमचं कुटुंब जास्त उत्साहित असतं,” असं कॅप्शन लिहित प्रथमेशने केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला प्रथमेश आणि त्याच्या होणाऱ्या बायकोवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केलं जात आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्य दोघांना पंचपक्वान्नातील पदार्थ भरवताना दिसत आहेत. मग कुटुंबाबरोबर प्रथमेश व क्षितीजा भन्नाट करताना डान्स पाहायला मिळत असून शेवटी दोघं रोमॅन्टिक डान्स करत आहेत.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – “आयुष्याचं छान वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पुरुषाची गरज नसते”, श्रृती मराठेचं वक्तव्य

प्रथमेशच्या केळवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कलाकार मंडळीसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता १४ फेब्रुवारी २०२४ला लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे.

हेही वाचा – Video: ‘या’ अभिनेत्रीने वडिलांच्या आजारपणामुळे सोडली लोकप्रिय मालिका, भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, प्रथमेश व क्षितीजाचा प्रेमविवाह आहे. इन्टाग्रामवर दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितीजा ‘टाईमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान भेटले. मग त्यांच्यातील मैत्री आणखी दृढ झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत.

Story img Loader