‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘३५ टक्के काठावर पास’, ‘टकाटक’, ‘डिलिव्हरी बॉय’, ‘डार्लिंग’ अशा अनेक मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेला प्रथमेश परब नेहमी चर्चेत असतो. प्रथमेशने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाने छाप उमटवली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने प्रथमेशने नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. आज प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. दोघं लग्नाचा पहिला वाढदिवस सध्या थायलंडमध्ये साजरा करताना दिसत आहेत. नुकतेच प्रथमेश व क्षितिजा लग्नानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्रीपला गेले आहेत. दोघांचे थायलंडमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने प्रथमेश परबने नुकतीच खास पोस्ट लिहिली आहे. तसंच त्याने लग्नातील खास क्षणाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रथमेश क्षितिजाला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये क्षितिजा वरमाळा घालून प्रथमेशच्या पायाला पडताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रथमेशदेखील तिच्या पाया पडतो. असे लग्नातील खास क्षण अभिनेत्याने शेअर केले आहेत. तसंच हे क्षण शेअर करत त्याने लिहिलं आहे, “२४.०२.२०२४ आतुरतेने वाट पाहिलेला आणि कधीही न विसरता येणार दिवस.”

प्रथमेश परबच्या या खास पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. “लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, “गोड जोडी”, “बायको विसरू पण देणार नाही…चिंता नसावी” अशा प्रकारच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, प्रथमेश परबच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘देवाचं घर’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संकेत माने दिग्दर्शित या चित्रपटात बालकलाकार मायरा वायकुळ मुख्य भूमिकेत झळकली होती. लवकरच तो हिंदी प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे.

प्रथमेशची बायको कोण आहे?

प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितीजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.

Story img Loader