अभिनयासह निर्मिती, दिग्दर्शन उत्तमरित्या पेलणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे पुष्कर जोग. सध्या पुष्कर नवनवीन विषयांवर वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी घेऊ येत आहे. काही महिन्यांपूर्वी पुष्करचा ‘द एआय धर्मा स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री दिप्ती लेले आणि स्मिता गोंदकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. पुष्करच्या या चित्रपटाची कथा अनेक प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. अशातच पुष्करने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता पुष्कर जोग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या आगामी कामाबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट करत असतो. तसंच राजकीय, सामाजिक घडामोडींवर परखड मत मांडत असतो. यामुळे अनेकदा पुष्कर जोग ट्रोलही झाला आहे. पण, या ट्रोलिंग त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने घेतली मैत्रीची परीक्षा; करणवीर मेहरा, विवियनसह ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

पुष्कर जोगने नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर त्याने मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “परमेश्वरा मी थकतोय…एकटा लढतोय…खूप वापरुन घेतात…खूप फसवतात…मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत कायम लढत राहीन.” या स्टोरी नंतर पुष्करने लेकीचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिलं की, माझ्या प्रेमा अशीच हसत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी काळजी घेईन.

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, भावुक पोस्ट करत मागितली माफी, म्हणाली…

पुष्कर जोग इन्स्टाग्राम स्टोरी
पुष्कर जोग इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – Video: “तुम्ही बेअक्कल लोक आहात…”, मुंबईच्या ट्रॅफिकमधील ‘ती’ कृती पाहून गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली…

त्यानंतर पुष्करने आणखी एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये अभिनेत्याने लिहिलं की, माझ्या देवांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये…मी सर्वांना सांगितलं की, तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही तर मी ग्रुप सोडेन…मग सर्व देवांनी व्हॉट्सअप ग्रुप सोडला आणि प्रत्यक्ष भेटले, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, सदैव धन्य राहा. मी हसलो आणि लगेच माझी आई आणि मुलीला ग्रुपमध्ये घेतलं. पुष्करच्या या पोस्ट सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

पुष्कर जोग इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, पुष्कर जोगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो आता मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम करताना दिसत आहे. ‘द एआय धर्मा स्टोरी’ या चित्रपटाच्या आधी त्याने ‘मुसाफिरा’ केला होता. या चित्रपटाच्या निर्मिती, दिग्दर्शनाची धुरा त्यानेच सांभाळली होती. ‘मुसाफिरा’मध्ये पुष्कर जोगसह पूजा सावंत, दिशा परदेशी, पुष्कराज चिरपुटकर असे अनेक कलाकार पाहायला मिळाले होते.