सध्या देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशातील जनता दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. महाराष्ट्रातील नेते मंडळीदेखील हा सण साजरा करताना दिसून येत आहे. नुकतंच मनसेने आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्य्रक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार मंडळी उपस्थित होती. मराठी चित्रपटाला नवी ओळख निर्माण करून देणारे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे, सचिन पिळगावकर, निवेदिता जोशी, वंदना गुप्ते, किरण शांताराम अशा मात्तबर मंडळींनी हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी कलाकारांच्या हस्ते या कार्यक्रमात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. या निमित्ताने माध्यमांशी बोलताना सचिन पिळगावकर असं म्हणाले की, “यावर्षी दीपावली साजरी होत आहे हे आम्हाला जाणवत आहे. गेली दोन वर्ष आपण अशा पद्धतीने सण साजरा करू शकत नव्हतो. राज, शर्मिला आणि त्याच्या टीममुळे आम्हाला दीपावली साजरी करायला मिळत आहे. त्यांच्यामुळे असे दीपोत्सव पाहायला मिळत आहेत. चित्रपट, नाट्यसृष्टीतील आम्ही कलाकार दिवे लावतो हे माहिती आहे सर्वांना, पण आज आम्ही खरोखर दिवे लावले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. राज या आमच्या मित्राला खूप खूप धन्यवाद.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

IND vs PAK T20 World Cup 2022 : भारत पाक सामन्यातला शाहरुख खानचा जुना व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेते महेश कोठारे, अशोक सराफ यांनीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबरीने राज ठाकरे यांच्या या अनोख्या संकल्पनेचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “तुम्हाला सगळ्यांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची जावो अशी मनोमन देवाजवळ प्रार्थना.”

या कार्यक्रमात प्राजक्ता माळी, संतोष जुवेकर, पंढरीनाथ कांबळी, संजय नार्वेकर यांच्यासारख्या नव्या दमाच्या कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. दादरमधील शिवाजी पार्क येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sachin pilgaonkar appreciating raj thackareys deepotsav event at shivaji park dadar spg
Show comments