मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार नाटकानिमित्त महाराष्ट्रभर दौरे करत असतात. मराठी संस्कृती, परंपरा याचबरोबर या कलाकारांना आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीबद्दल विशेष आकर्षण आहे. नाटकाच्या दौऱ्यावर जाणारे कलाकार ग्रामीण भागातील विविध पदार्थांचा आस्वाद घेतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मध्यंतरी सोनाली कुलकर्णीने लोणावळ्याच्या घाटात स्वत: भट्टीवर मका भाजत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. सध्या आणखी एका अभिनेत्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रेणुका शहाणेंच्या लग्नात नणंदेने केलं होतं कन्यादान, नेमकं काय घडलं?

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकामुळे अभिनेता संदीप पाठक घराघरांत लोकप्रिय झाला. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अभिनेता संदीप पाठकने मनोरंजन विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. संदीप फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. सामान्य लोकांशी संवाद साधणं असो वा चाहत्यांशी आदराने बोलणं असो यामधून त्याची माणूसकी दिसून येते.

हेही वाचा : रेणुका शहाणे : मनमोहक हास्याने भुरळ घालणारी ‘सुरभि’ ते माधुरी दीक्षितची लाडकी ‘शहाणी’

अलीकडेच नाटकाच्या दौऱ्यानिमित्त प्रवास करत असताना संदीपला गरमागरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. गाडी थांबवून त्याने दुकानदाराची विचारपूस केली आणि भर रसत्यात स्वत:च्या हाताने गरमागरम भजी तळली. हा व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “प्रवासात मला प्रत्येक ठिकाणी थांबून वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. सुरडी फाटी (कळंब) जवळ आकाश नावाचा मुलगा गरम गरम भजी तळत होता, मला मोह झाला भजी तळण्याचा आणि खाण्याचा. Thank you आकाश” असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “तुला हे शोभत नाही”, नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर सई लोकूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “येणाऱ्या बाळाला…”

दरम्यान, अभिनेत्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचा साधेपणा पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडीओवर युजर्सनी “तुम्ही मनाने खूप छान आहात मानलं तुम्हाला”, “तुम्हाला देव काहीही कमी पडू देणार नाही”, “संदीप पाठक हा सेलिब्रिटी असूनही गरीब लोकांना सपोर्ट करतो”, “सर या व्हिडिओने सामान्य आणि होतकरू मुलांचा व्यवसायासाठीचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल” अशा प्रतिक्रिया देत संदीप पाठक यांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sandeep pathak making pakodas on roadside video viral on social media sva 00