दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि गाणी चांगलीच हिट होताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. वाळवी या चित्रपटाबद्दल अभिनेता संदीप पाठक याने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता संदीप पाठक हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. संदीपने आतापर्यंत अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप उमटवणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. संदीप पाठकने नुकतंच वाळवी चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली. यानंतर त्याने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. संदीप पाठकने ट्विटरवर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील-सुबोधचा ‘वाळवी’ पाहायलाच हवा, कारण…

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

“आज वाळवी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. गेल्या काही वर्षातील मला सगळ्यात आवडलेला सिनेमा.सगळ्यांचे परफॉर्मन्स कम्माल, परेश आणि मधुगंधा लेखन, दिग्दर्शन अफलातून,विनोदी अंगाने जाणारा रहस्यपट. हा सिनेमा मी कितीही वेळा बघू शकतो”, असे संदीप पाठकने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “प्राण्यांवरच्या बायोपिकची सुरुवात माझ्यापासून…” सुबोध भावेने उडवली स्वत:चीच खिल्ली

दरम्यान झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच हिट ठरताना दिसत आहे. यात हे कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे.

Story img Loader