ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी आपल्या खुमासदार लेखणीने, अभिनयाने, स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं आहे. आजवर त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. किस्से सांगण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. भाषेची-साहित्याची उत्तम जाण असणारे संजय मोनेंनी नुकतीच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या त्यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांचे सुरुवातीचे दिवस सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय मोने म्हणाले, “शरद पोंक्षे माझा जुना मित्र आहे. तो सुरुवातीला छोटी-मोठी काम करत होता. बेस्टमध्ये नोकरीला होता. माझ्या एका नाटकामध्ये तो बदलीची भूमिका म्हणून करायला आला होता. अगदी छोटी, नगण्य म्हणावी अशी भूमिका होती. म्हणजे लांबीच्या दृष्टीने. तो आला आणि मला म्हणाला, मला काहीच नीट कल्पना नाहीये. जमतेम एक तालीम मिळाली आहे. पण तू दुसऱ्या प्रयोगाला होता. मी म्हणालो, तू काळजी करू नकोस. तू फक्त ऐकत राहा. मी काय सांगतो ते. मग मी तोंडावर हात ठेवून हळूच म्हणायचो, पुढे हो. तर तो पुढे व्हायचा. वाक्य त्याला चोख पाठ होती. मग त्याला वळ म्हटलं की, मागे वळायचा. असं सगळं करत तो प्रयोग केला होता. लोकांना काही कळलं नाही. आम्ही हे चालू प्रयोगात केलं होतं.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’चा टीआरपी घसरला, दुसरं स्थान मिळवलं ‘या’ मालिकेने; जाणून घ्या टॉप-१० मालिका

“यानंतर त्याने माझे आभार मानले. मी म्हटलं, अरे आभार कसले मानतोस. तू माझ्यावर उपकार केलेस वेड्या. तू तुझं काम करून चुकला असता आणि गेला असतास तरी तुला कोणी बोललं नसतं. लोकांना हे दिसलं नसतं. मी मोठ्या भूमिकेत होतो, मला म्हणाले असते, ह्याला अक्कल नाही. एवढे प्रयोग करून सुद्धा याला पाठ होतं नाही. हा चुकतो कसा? असे बोलले असते. त्यामुळे मी तुझे आभार मानले पहिजे. त्यानंतर तो छोटी-मोठी काम करत होता. म्हणजे कदाचित त्याच्या मनात एकदा आलंही असावं की, आपण या क्षेत्रात काम करून चुकतं तरी नाही ना? त्यापेक्षा नोकरी करावी, असं विचार आला असावा.”

हेही वाचा – म्हातारी म्हणणाऱ्यांना अन् दातावरून हिणवणाऱ्यांना जुईली जोगळेकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्वतःची अक्कल…”

पुढे संजय मोने म्हणाले,”एक दिवस त्याला विनय आपटे यांनी नथुरामच्या भूमिकेसाठी निश्चित केलं. तिथून त्याच्या आयुष्यामध्ये ३६० अंशात बदल झाला. तो संपूर्ण बदलला. मूळतः कुठेतरी एक गाठ बसलेली असते, बऱ्याच कलाकारांमध्ये ती गाठ असते. माझ्यामध्ये देखील आहे. ती गाठ एकदा निघाली ना, की तुम्ही मोकळे होता. जसं पू.ल देशपांडेच्या एका पुस्तकात आहे की, त्याच्या आयुष्यातला बोळा निघाला आणि पाणी वाहत झालं. तसंच त्याची गाठ निघाली असेल किंवा बोळा निघाला असेल. मी त्याच्या नथुराम गोडसेच्या पहिल्या प्रयोगाला गेलो होता, कारण तो आपला मित्र आहे. ते जे सगळं बघितलं आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही प्रसंग ओढवतं होते, त्या परिस्थितीत तो करत होता. आता ती प्रणाली पटेल न पटेल. पण तो काम उत्कृष्ट करत होता. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु हे सगळं सहन करून त्याला काय मिळणार होतं. तर त्या भूमिकेमुळे त्याला नाव मिळणार होतं. ती अशी काही राष्ट्रपुरुषाची भूमिका नाही जी करून त्याचं नाव असं कुठेतरी उंचावर पोहोचले. पण त्याने नथुराम गोडसे करताना जे काही धैर्य दाखवलं, ते धैर्य खूप कमी लोक दाखवतात.”

दरम्यान, शरद पोंक्षे यांचा मुलगा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. स्नेह पोंक्षेचा पहिला चित्रपट येत्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात संजय मोने देखील काम करणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sanjay mone talk about sharad ponkshe struggle period pps