नाटक, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे घराघरांत लोकप्रिय झाला. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमांमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. सध्या नाटकाच्या निमित्ताने संकर्षण अमेरिका दौऱ्यावर गेला आहे. तो अभिनयाबरोबरच उत्तम कवी म्हणून देखील ओळखला जातो. मराठी कलाविश्वात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. सध्या त्याचा असाच एक कौतुकास्पद व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आकर्षक सजावट, मोदक अन्…”, ‘ठरलं तर मग’च्या सेटवर गणेशोत्सवाची तयारी, जुई गडकरीने शेअर केली खास झलक

संकर्षण कऱ्हाडेने अमेरिका दौऱ्यावर तेथील मराठी प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी खास देशभक्तीपर कविता सादर केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : मराठमोळ्या प्राजक्ता कोळीने नेपाळी बॉयफ्रेंडसह गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्रीचा होणार नवरा?

संकर्षण कऱ्हाडेची कविता…

भिन्न भाषा, भिन्न राज्यं वेगवेगळा वेश आहे.
संस्कृतीने नटलेला भारत माझा देश आहे.

कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर,
सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर

साहित्य, कला, विज्ञानातही सुवर्ण अक्षर गिरवायचंय अन्
येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय

विनंती करतो भावांनो अनावश्यक खिसा भरू नका
चार घास कमी खा…पण, भ्रष्टाचार पुन्हा करू नका.

सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू
रमजान-दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू.

काय कोणाची बिशाद आता आणि काय कोणात आहे दम
मनात ठेवा देशाला अन् म्हणावं ते वंदे मातरम.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’चा बॉक्स ऑफिसवर डंका, प्रदर्शनाच्या १०व्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

अमेरिकेत राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांच्या विनंतीचा सन्मान करून संकर्षणने ही देशभक्तीवर आधारित खास कविता सादर केली. कविता सादर केल्यावर प्रेक्षकांनी संकर्षणचं भरभरून कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. संकर्षण अलीकडेच ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेला आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sankarshan karhade perform patriotic poem in america video goes viral sva 00