मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. पण त्याचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. परभणीमधून आलेल्या संकर्षणसाठी कलाक्षेत्रामध्ये काम करणं आव्हानात्मक होतं. यादरम्यान त्याला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. मराठी नाटक, मालिकांमधूनही त्याला काढण्यात आलं. याचबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षणला त्याच्या कलाक्षेत्रातील प्रवासाबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्याने काही खुलासे केले. संकर्षण म्हणाला, “२००८मध्ये ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमामुळे मला ओळख मिळाली. पहिल्यांदा मी छोट्या पडद्यावर दिसलो. झी मराठीवर हा कार्यक्रम होता. तिथपासूनच माझ्या थोड्याफार ओळखी झाल्या. पण तरीही मला काही मालिकांमधून काढून टाकण्यात आलं. काही मालिकांसाठी मी लूक टेस्टपर्यंत जायचो आणि मला नाकारलं जायचं”.

आणखी वाचा – ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली होती बस, पहिल्यांदाच ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाला, “रात्री दोन वाजेपर्यंत…”

“स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वप्नांच्या पलिकडले’ मालिका होती. चिन्मय उद्गीरकर व गौरी नलावडे या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेसाठी मी तीन दिवस चित्रीकरण केलं. चौथ्या दिवशी मला फोन आला की, सर तुमचं काम काही बरं होत नाही. यापुढे चित्रीकरणासाठी येऊ नका. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी खूप रडलो. कारण मी एमबीए करत काम करत होतो. ‘मी रेवती देशपांडे’ नावाच्या नाटकामधूनही मला दोन महिन्यांची तालिम, दहा प्रयोग झाल्यानंतर काढून टाकण्यात आलं होतं. काम जमत नाही, तू मोहन जोशी यांचा मुलगा वाटत नाही असं कारण मला देण्यात आलं”.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

“मला नकार यायचा तेव्हा वाईट वाटायचं. पण अशावेळी तुमच्याबरोबर कोण आहे हे अधिक महत्त्वाचं असतं. ‘स्वप्नांच्या पलिकडले’ मालिकेमधून मला बाहेर काढल्यानंतर मी रडतच स्टुडिओच्या बाहेर पडलो. तेव्हा एका व्यक्तीने मला मागून हाक मारली. “काय झालं?” असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा ती व्यक्ती मला म्हणाली, “एक दिवस तू तुझ्या कामामध्ये इतका व्यग्र असशील की, तुला ज्या व्यक्तीने आता मालिकेमधून काढलं आहे ते तुला कामासाठी फोन करुन विचारतील. तेव्हा तुझ्याकडे वेळ नसेल”. ती व्यक्ती म्हणजे अशोक शिंदे”. संकर्षणचा हा संपूर्ण प्रवास खरंच थक्क करणारा आहे.