मराठी चित्रपटांमध्ये सातत्याने नवनवे प्रयोग होताना दिसून येत असतात. सध्या मराठी चित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची लाट जरी आली असली तरी इतर जॉनरचे चित्रपटदेखील येत आहेत. अभिनेता संतोष जुवेकरचा ‘३६ गुण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचे आणि संतोषचे कौतुक केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोषने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटगृहातील फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहले आहे, ‘हे असं प्रेक्षकांनी गच्च भरलेले सिनेमा थिएटर पहिला आणि तेही जरका आपल्या सिनेमासाठी असेल तर काय फील होत ते नाही सांगू शकत मित्रांनो’!! अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विषय जरी बोल्ड असला तरी आजच्या पिढीला विचार करायला लावणार हा चित्रपट आहे.

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची महत्त्वाची घोषणा; “आता महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहं…”

ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा चित्रपट आहे. संतोष या चित्रपटात नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसल्याने त्याचे चाहतेदेखील चित्रपट बबघण्यासाठी गर्दी करत आहेत.

या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्याबरोबर पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत.या चित्रपटाची निर्मिती हन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sanotsh juevkar shared emotional post regarding his housefull film 36 gun spg
Show comments