दहीहंडीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्व गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे. अलीकडेच राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीप्रमाणे प्रो-गोविंदा ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जय जवान या गोविंदा पथकाला पहिले विजेते होण्याचा मान मिळाला. केवळ ४२.५१ सेकंदात ८ थर लावून जय जवान पथकाने जेतेपदाला गवसणी घातली. अशाप्रकारे राज्यभरात सध्या सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्यानं दहीहंडी सरावात सहभागी होऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. या अभिनेत्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “तुमचा लेखक कुठे आहे?” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतप्त; म्हणाले…

हा मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून संतोष जुवेकर आहे. संतोष हा दरवर्षी दहीहंडीला गोपाळ मित्रांना आवाहन करत असतो. गेल्या वर्षी त्यानं दहीहंडी सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका, असं आवाहन केलं होतं. यावर्षी संतोषनं दहीहंडी फोडण्याची सुप्त इच्छा पूर्ण करून पुन्हा गोपाळ मित्रांना विनंती केली आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेसाठी संपूर्ण मालिकेतील ‘हा’ सीन होता चॅलेजिंग; म्हणाली, “मला रात्री…”

नुकताच संतोषनं दहीहंडी फोडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहीलं आहे की, “अनेक वर्ष झाली दहीहंडी खेळून आणि हे असे थर रचून हंडी फोडणं याची मजा काही औरच. खूप मीस करतो ही मजा यार. आता सेलिब्रिटी सारखं जाऊन स्टेजवर उभं राहून हंडी बघणं आणि सगळ्यांना फोटो देत भेटत हात दाखवत गप गाडीत बसून कल्टी. पण काल माझ्या मित्रांनी नितीन चव्हाण आणि अजय सुपेकरने माझी इच्छा पूर्ण केली… काल शिवशाही क्रीडा मंडळ, नेरुळ (वाशी), सेक्टर १० मध्ये टिपिकल चाळकरी माहोलमध्ये दहीहंडीच्या सरावात तिकडच्या माझ्या सारख्याच माझ्या चाळीतल्या मित्रानं बरोबर थर रचून हंडी फोडायला मिळाली…… जाम खूष झालो… धन्यवाद भावांनो…बाकी सगळ्यांना खूप प्रेम…मज्जा करा. आणि काळजी पण घ्यारे स्वतःची आणि इतरांची. खास करून सर्व गोपाळ मित्रांना एक विनंती हंडी फोडायला वर चढणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्या जपा त्यांना.”

हेही वाचा – कुणी म्हणाले वेडे, तर कुणी म्हणाले प्रेरणादायी; अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा – बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘या’ पदी नियुक्ती; म्हणाली, “मला…”

दरम्यान, संतोषच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या महिन्यात त्याचा ‘डेट भेट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये संतोष अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हेमंत ढोमेबरोबर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला होता. शिवाय त्याचा २१ जुलैला ‘माइनस ३१- द नागपुर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor santosh juvekar enjoyed dahi handi 2023 video goes viral on social media pps