मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारा संतोष जुवेकर लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘रानटी’ असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची म्हणजे ‘बाळा’च्या भूमिकेत संतोष पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी चक्क संतोषने टक्कल करून घेतलं आहे. एवढंच नव्हे तर त्याने पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. नुकताच ‘रानटी’ चित्रपटातील संतोषचा पहिला लूक समोर आला आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून त्याचा खतरनाक अंदाज पाहायला मिळत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअपमध्ये धावण्यापासून ते अगदी अ‍ॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्वीकारत संतोषनी घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली त्यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’, जोरजोरात ओरडत म्हणाले, “जयश्री आय लव्ह यू”

‘रानटी’ चित्रपटातील लूक संतोषने सोशल मीडियावर शेअर केला आहे. संतोषचा हा खरतनाक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. “भारी”, “कडक”, “आला रे आला आपल्या संत्या आला”, “लय खतरनाक दिसतोयस”, “एक नंबर”, “लय भारी”, “किंग इज बॅक”, “भाऊ काय ऐकत नाय…”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

या भूमिकेबद्दल संतोष म्हणाला की, कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते. दिग्दर्शक समित कक्कडकडून मला नेहमी माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह व्दिगुणीत होतो. भूमिकेचं सोनं करण्यासाठी मी वाटेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधील १७ सदस्यांवर पडले भारी, जेलमध्ये न जाण्यासाठी काय-काय केलं? जाणून घ्या…

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.