चित्रपट, मालिका, ओटीटी या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजेच संतोष जुवेकर. तो त्याच्या दमदार भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच अभिनेत्याचा एक मराठी व हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण तो सध्या एका व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तो घोडेस्वारी शिकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं विनोदी शैलीत कॅप्शन लिहिलं आहे; ज्यावर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हेही वाचा – “मुख्यमंत्र्यांना सलाम!” इर्शाळवाडी दुर्घटनेतील एकनाथ शिंदेंचे काम पाहून हार्दिक जोशीकडून स्तुतिसुमने, म्हणाला…

संतोषनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “फारच रुबाबदार प्राणी आहे हा. कसली ग्रेस आहे ह्याच्यात स्टड (Stud) आहे साला, असं घोड्याला वाटलं मला बघून. मी घोडास्वारी (Horse Riding) शिकायचं मनावर घेतलंय आणि घोड्यानं मला पाठीवर घेतलंय..शीईईई! बकवास जोक.”

हेही वाचा – “मला असे विषय त्रास देतात,” ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवरील वेब सीरिजबद्दल मधुराणी प्रभुलकरने मांडले स्पष्ट मत; म्हणाली “माझं डोकं…”

अभिनेत्याचा या व्हिडीओ व कॅप्शनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “घोडा समोर येऊन वळला तेव्हा कळलं ही एक सात्विक रील आहे, स्ट्रगलर सालाचा नवीन प्रोमो व्हिडीओ नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “सावत्या लेका भारी आहेस रे तू, तुला घोड्यानं पाठीवर घेतलं आणि त्याच्यात ग्रेस आली, स्टड साला.” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहिलं की, “भयंकर आहात तुम्ही”

हेही वाचा – “सेक्सची भूक ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो”; किरण मानेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

दरम्यान, संतोषनं हा व्हिडीओ शेअर करताना न्यू फिल्म असं हॅशटॅग दिलं आहे. त्यामुळे तो नवीन चित्रपटासाठी घोडास्वारी शिकत असल्याचं म्हंटलं जात आहे. नुकताच त्याचा ‘डेट भेट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये संतोष अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हेमंत ढोमेबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. तसेच २१ जुलैला संतोषचा ‘माइनस ३१- द नागपुर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यामध्ये रुचा इनामदार, रघुबीर यादव, शिवांकित सिंह परिहार, राजेश शर्मा, समिधा गुरू यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor santosh juvekar learning horse riding video viral pps