‘मोरया’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता संतोष जुवेकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. संतोषनं मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळी छाप उमटवली आहे. त्यानं हिंदीतील बऱ्याच चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. लवकरच तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही नशीब आजमावणार आहे. अशातच संतोषची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

pune city reasons to avoid firecrackers noise pollution during Diwali pune
कर्णसुखद की नेत्रसुखद!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
MP udayanraje Bhosle critisize sharad pawar in karad
शरद पवारांना फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे, खासदार उदयनराजेंचा टोला
Toddlers strugglet to help family to sale Diwali diya heart touching video
VIDEO: खरंच परिस्थितीसमोर झुकावं लागतं! दिवाळीचे दिवे विकताना चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून म्हणाल “लेक असावा तर असा”
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
ulta chashma
उलटा चष्मा : ‘देवा’घरचा न्याय…
Marathi Actor Milind Gawali Share memories of atul parchure
“अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही”, अतुल परचुरेंच्या आठवणीत मिलिंद गवळी भावुक; पोस्ट करत म्हणाले, “तो हतबल झाला…”

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. स्वतःच्या आयुष्यशी निगडीत असलेल्या गोष्टी नेहमी शेअर करत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये संतोषनं आवडत्या सलुनविषयी सांगितलं आहे. पत्र्याच छप्पर असलेल्या सलुनचा फोटो शेअर करत संतोषनं लिहीलं आहे की, “मला नेहमी ब्रँडेड गोष्टी लागतात. मी असा उगाच कुठेही कुठल्याही जागी जात नाही जेव्हा मला माझा मी हवा असतो… ते फस फस करून उडवलेलं पाणी, फळीवरच्या लॉरीयलच्या बाटलीतलं खोबरेल तेल जेव्हा पच पच करून माझ्या डोक्यावर तो थापतो आणि खसा खसा घासतो. मग जेव्हा विचारतो ना प्रेमाने “बरं वाटतंय का रे?” तेव्हा अगदी घरी असल्यासारखं वाटतं, आईची आठवण येते….मला हा माझा ब्रँड कायम बरोबर हवाय. बस इतनासा ख्वाब है!”

हेही वाचा – कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; श्रीरामाशी तुलना करत म्हणाली…

हेही वाचा – ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर लवकरच नव्या भूमिकेत; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर पाहायला मिळणार

संतोषचा हा साधेपणा नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘संतोष सरांचा साधेपणा कायमच आमची मनं जिंकून जातो. मातीशी जोडलेला एकमेव अभिनेता असं म्हणायला हरकत नाही.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं संतोषला मराठीतला रामचरण असं म्हटलं आहे.

हेही वाचा – सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकर सात महिने घरी का बसला होता? नेमकं काय घडलं होतं? वाचा

दरम्यान, संतोषच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्याच ‘गोविंदा आया आया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. गेल्या महिन्यात त्याचा ‘डेट भेट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये संतोष अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व हेमंत ढोमेबरोबर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला होता. शिवाय त्याचा २१ जुलैला ‘माइनस ३१- द नागपुर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता.