संतोष जुवेकर हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘रेगे’, ‘एक तारा’, ‘३६’ गुण यांसारख्या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवत संतोष घराघरात पोहोचला. मराठमोळ्या संतोष जुवेकरचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोषने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. घराच्या खिडकीतून हा व्हिडीओ त्याने शूट केल्याचं दिसत आहे. संतोषने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये धुराचे लोट हवेत पसरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने संतप्त पोस्ट लिहिली आहे. “हे काय आहे ओ? बहुतेक गुदमरून मारण्यासाठी केलेले कॉन्ट्रॅक्ट किंवा स्वतः गुदमरून मरण्यासाठी केलेली सोय?” असं संतोषने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “क्रिकेटर्स माझ्याकडे वाईट नजरेने…”, मंदिरा बेदीने क्रिकेट विश्वाबद्दल केलेला खुलासा, म्हणालेली, “त्यांना वाटायचं मी…”

अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आकाशी उच उडणारे पक्षी पण त्या धुरातून गुदमरून ओरडत इकडून तिकडून उडताना दिसत आहेत… किती भयानक आहे हे सर्व” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “रबाळेमध्ये काल केमिकल कंपनीला आग लागली होती…त्याचा धूर असेल,” असं म्हटलं आहे. “मी पण आताच ट्रेनमधून पाहिलं. महापेजवळ कुठेतरी आहे,” अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> “माझं न्यूड फोटोशूट पाहून मित्राने फोन केला अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तो फोटो फ्रेम करून…”

दरम्यान, संतोष जुवेकर ‘रावरंभा’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जालिंदर हे पात्र साकारताना तो दिसणार आहे. हा चित्रपट १२ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याआधीही अनेक ऐतिहासिक चित्रपटांत संतोष जुवेकर झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor santosh juvekar shared pollution video angry reaction kak