मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत संतोष जुवेकरने प्रेक्षकांना आपलसं केलं. तो इथवरच थांबला नाही. हिंदीमध्येही त्याने काम करण्याची जिद्द ठेवली. हिंदी वेबसीरिजमध्येही त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. त्याला अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘रावरंभा’ चित्रपटही चर्चेचा विषय ठरला. सध्या संतोष त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे. संतोष उज्जैनला गेला होता. तेथील व्हिडीओ संतोषने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

निर्माते महेश पटेल व ‘सैराट’फेम आकाश ठोसरसह उज्जैनमधील महाकाल आणि कालभैरवाचं दर्शन घेतलं. या मंदिरातील व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला. तसेच त्याने यादरम्यानचा अनुभव सगळ्यांबरोबर शेअर केला. हा अनुभव सांगत असताना त्याने दर्गा, चर्चचाही उल्लेख केला. यावरुनच नेटकऱ्यांनी संतोष सुनावलं. यावर संतोषने कमेंट करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल
Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
hemant dhome Kshitee Jog
“माझं आणि क्षितीचं चौथं बाळ…”, नव्या सिनेमासाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट! प्रेक्षकांना म्हणाला…

आणखी वाचा – लेह-लडाखला पोहोचले समीर चौघुले, फोटो पाहून प्राजक्ता माळीची कमेंट, म्हणाली, “दादा…”

दर्गा व चर्चमध्ये गेल्यानंतरही तितकीच सकारात्मक उर्जा मिळते असं संतोषचं म्हणणं होतं. यावर एका युजरने कमेंट केली की, “चर्च व दर्ग्यामध्ये जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही फक्त कलाकार आहात म्हणून या गोष्टी करता असं मला वाटतं. पण असो बाकी तुमचं मत”. युजरने केलेली कमेंट पाहून संतोषला रिप्लाय करण्याचा मोह आवरला नाही.

आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”

संतोषने रिप्लाय केला की, “मित्र मी एक कलाकार असण्यापूर्वी माणूस म्हणून स्वतःला पाहतो. आपण आपल्या आयुष्यात, आपल्या क्षेत्रात कितीही उत्तम असलो तरी चांगला माणूस होण्यासाठी सकारात्मक उर्जेची गरज अधिक भासते. म्हणूनच मी या त्रिदेवांना जी प्रार्थना केली आहे ती भावा नीट वाच”. संतोषच्या या उत्तराने युजरची बोलती बंद केली.

Story img Loader