मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच संतोष जुवेकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनात असलेली असे इच्छा बोलून दाखवली आहे.
संतोष जुवेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘राज आलं’ या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक चित्रपट करायला मिळावा, असे म्हटले आहे. त्याने स्वत: पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “गोव्याला गेलो तरी २० ते २५ हजार खर्च होतात मग…”, संतोष जुवेकरने चाहत्यांना केलं दत्तक पालक होण्याचे आवाहन
संतोष जुवेकरची पोस्ट
“खूप इच्छा होती आणि अजूनही आहे माझ्या शिवबा राजं वर निघणाऱ्या सिनेमात काम करण्याची, फक्त एक गाणं मिळालं आनं जीव आपसूक गुंतला, वीज कडाडली अंगात आणि नाद नाद लागेल असा नाचलो.
अख्खा सिनेमा मिळाला करायला तर काय आग लागलं ओ. माझ्या राजाच्या आशिर्वादानं ही संधी पण लवकरच येईल माझ्या आयुष्यात. जय भवानी, जय शिवराय, जय जय रघुवीर समर्थ”, असे संतोष जुवेकरने म्हटले आहे.
आणखी वाचा : “पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक
दरम्यान संतोष जुवेकरने मालिका, चित्रपट, नाटक या सर्व प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवली आहे. त्याने ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. त्याबरोबरच संतोष जुवेकर हा ‘३६ गुण’ या चित्रपटात झळकला होता.