लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे म्हणतात. मात्र लग्न जुळवताना पत्रिकेत किती गुण जुळत आहेत त्यावर लग्न करायचे की नाही हे ठरवले जाते. मात्र ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे या गोष्टींच्या पलीकडे जाऊन पत्रिकेपेक्षा एकमेकांच्या मतांना प्राधान्य देणे हाच संदेश ‘३६ गुण’ या मराठी चित्रपटात दिला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विषय जरी बोल्ड असला तरी आजच्या पिढीला विचार करायला लावणार हा चित्रपट असणार आहे. ट्रेलरमधून आजची पिढी लग्नव्यवस्थेतील किचकट, मानसिक ताणतणावाची प्रक्रिया बदलू पाहते आहे याची झलक पहायला मिळते. लग्नानंतर प्रत्येक बाबतीत एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न ‘३६ गुण’ चित्रपटातून करण्यात आला आहे. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कियारा अडवाणीने मराठीत मानले आभार; म्हणाली…

या चित्रपटातील कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. चित्रपटाचा हिरो अर्थात संतोष जुवेकर असं म्हणाला की माझी आतापर्यंतची रावडी इमेज बदलणारा हा चित्रपट आहे. वेगळी भूमिका करायला मिळल्याचा नक्कीच आनंद आहे. तर पूर्वा सांगते की, ‘खूप दिवसानी मी चित्रपटात काम केल आहे, आमचं टीमवर्क तुम्हाला या चित्रपटात दिसेल’. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आले आहे. नात्यांमध्ये समतोल साधणं खूप महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.

या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती हन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor santosh juvekars new marathi film 36 gun trailer released spg