‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे काल, २५ डिसेंबर लग्नबंधनात अडकली. कन्टेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरबरोबर गौतमीने लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात गौतमीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या गौतमीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सारंग साठ्येने नुकताच गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरच्या लग्नातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गौतमी-स्वानंदच्या लग्नातील न पाहलेले क्षण पाहायला मिळत आहेत. हळद, संगीत आणि लग्नातील धमाल-मस्तीचे क्षण या व्हिडीओत आहेत. व्हिडीओ शेअर करत सारंगने लिहिलेल्या कॅप्शनने चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: इशान किशनने अमिताभ बच्चन यांना विचारला पत्नी जया यांच्याविषयी प्रश्न, बिग बी म्हणाले, “भाई साहब…”

सारंग साठ्येने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “इसको बोलते है #SwaG शादी! भावाची वरात पोरं जोमात और भाई के शादी नहीं नाचे तो क्या नाचे? स्वानंद-गौतमी, एकच सांगतो ४ आण्याची पेप्सी जोडी तुमची सेक्सी…”

हेही वाचा – Video: बदलापूर कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करच्या पतीने गायलं मराठी गाणं, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुझं मराठी…”

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळीसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वानंदने प्रतिक्रिया देत लिहिलं आहे, “मॅक्स लव्ह ब्रदर…” तसेच “कडक रे”, “क्या बात है”, “जगात भारी…विशेष धमाल”, “पॉला वहिनी एकदम भारी दिसतायत”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sarang sathaye share unseen moments in gautami deshpande and swanand tendulkar wedding pps