कलाकार मंडळी आयुष्यात आलेला प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. मग तो फक्त स्ट्रगलचा काळ नाही, तर दररोजच्या प्रवासतही येणारे अनुभव सांगत असतात. असाच काहीसा अनुभव नुकताच अभिनेता सौरभ गोखलेने सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपासून पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा पुणेकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. या सेवेचा लाभ अभिनेता सौरभ गोखलेने घेतला आहे. याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून पुणेकरांना एक सल्लाही दिला आहे.

हेही वाचा – शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये दाखल; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

सौरभने इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो म्हणाला की, “हॅलो. मी आज नवीन सुरू झालेल्या मेट्रोचा पहिला प्रवास केलेला आहे. माझ्या पिंपरी-चिंचवडच्या घरापासून ते कलावंतची प्रॅक्टिक्स आहे, तिथेपर्यंत प्रवास केला आहे. आश्चर्यकारक अनुभव आहे. आता पुणेकरांनी आवर्जुन ही सेवा वापरावी. स्वच्छ ठेवावी, एवढीच अपेक्षा आहे. खूप सुंदर आहे. महा मेट्रो, पुणे मेट्रो खूप भारी.” या व्हिडीओबरोबर अभिनेत्याने पुणे मेट्रोच्या तिकिटाचा फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: “…तेव्हापासून ३६ वर्षे मी दारुचा एक थेंब प्यायलो नाही”; महेश भट्ट यांनी बिग बॉस ओटीटीच्या घरातील सदस्यांना सांगितला ‘तो’ किस्सा

हेही वाचा – “मला लोक घाबरतात” स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षेंचे वक्तव्य, म्हणाले, “…त्यामुळे माझी सटकते”

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गिकांचा समावेश आहे. यात पहिली मार्गिका गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर दुसरी मार्गिका ही फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट अशी आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor saurabh gokhale share first experience about pune metro pps
Show comments